धक्कादायक! ढाब्यावर सुरू होते सेक्स रॅकेट, पोलिसच देत होते मालकाला संरक्षण
By पूनम अपराज | Updated: November 28, 2020 20:43 IST
1 / 6डीएसपी दीनानगर यांनी पोलिस पथकासह ढाब्यावर छापा टाकला. ढाब्यात वेश्याव्यवसाय बराच काळापासून सुरू होता. छापा टाकून प्रेमी जोडप्यासह हॉटेलच्या मालकास पोलिसांनी अटक केली असून मुलगी पुरवठा करणारी एक महिला अद्याप फरार आहे. (All Photos - Aaj tak)2 / 6दीनानगरचे पोलीस स्टेशन प्रभारी कुलविंदर सिंग यांनी सांगितले की, येथील डीएसपीला दिवाणगरच्या बस अड्ड्याजवळील छिंद ढाबा येथे वेश्या व्यवसायाचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती.3 / 6माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला, त्यानंतर एका मुलाला आणि मुलीला छाप्यात आक्षेपार्ह परिस्थितीत अटक केली. हॉटेल मालकालाही घटनास्थळावरून अटक करण्यात आली आहे. 4 / 6हॉटेलमध्ये मुलींना पुरवठा करणारी एक महिला अद्याप फरार आहे. सध्या पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करून फरार महिलेचा शोध सुरू केला आहे.5 / 6ढाब्याच्या मालकाकडे शिवसेनेत पंजाबचे उपाध्यक्षपद असून पोलिसांनी त्याला बंदूकधारी दिले होते, अशी दबक्या आवाजात कबुली देत शिवसेनेच्या अन्य नेत्याने उघड केली आणि पुढे त्याने सांगितले, काही दिवसांपूर्वीच त्याला या पदावरून हटविण्यात आले.6 / 6ढाब्याचा मालक हा शिवसेनेचा पंजाबचा उपाध्यक्ष असल्याचे पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले आणि पोलिसांनीही त्यांना संरक्षण दिले होते, परंतु पोलिस याविषयी काहीही बोलण्यास तयार नव्हते, अशा माहिती आज तकने दिली आहे.