शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Sachin Vaze: मनसुख हिरेन हत्येसाठी रेल्वे स्टेशन बाहेर रुमाल कोणी खरेदी केले?; NIA च्या हाती CCTV फुटेज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 5:10 PM

1 / 10
मागील काही दिवसांपासून NIA मनसुख हिरेन हत्याकांड आणि अँटेलिया प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणात आतापर्यंत ५ लोकांना अटक केली आहे. यात ३ पोलीस अधिकारी जे मुंबई पोलीस दलात कार्यरत होते आणि एक निलंबित कॉन्स्टेबल, एक क्रिकेट बुकींचा समावेश आहे.
2 / 10
५ मार्च रोजी मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीकिनारी सापडला होता. त्यावेळी हिरेन यांचा चेहरा मंकी कॅपने झाकलेला होता तसेच त्यांच्या तोंडातून अनेक रुमाल बाहेर काढण्यात आले होते. तेव्हा प्रथमदर्शनी मनसुख हिरेन यांची हत्या केल्याचा संशय अनेकांनी व्यक्त केला होता.
3 / 10
आता NIA च्या तपासात ते सर्व रूमाल ४ मार्च रोजी कळवा रेल्वे स्टेशन बाहेर रुमाल विकणाऱ्याकडून खरेदी केले होते. हे रुमाल सचिन वाझेनेच खरेदी केल्याचा संशय NIA ला आहे. NIA ला याबाबत एक CCTV फुटेज मिळालं आहे ज्यात एक व्यक्ती रुमाल विकत घेताना दिसत आहे.
4 / 10
हा व्यक्ती सचिन वाझेच असल्याचा संशय NIA ला आहे. हे सगळे रुमाल सचिन वाझेने मनसुख हिरेन यांचा चेहरा लपवण्यासाठी केला असावा अशी शंका आहे. NIA सध्या हिरेन यांच्या मृत्यूबाबत प्रत्येक गोष्टींचा बारकाईने तपास करत आहे. ज्यामुळे लवकरात लवकर या हत्येचा सुगावा लागू शकतो.
5 / 10
सध्या NIA ने या प्रकरणात रुमाल विकणाऱ्याचा जबाबही नोंदवला आहे. सुरुवातीला सचिन वाझेने हिरेन यांच्या मृत्यूवेळी ते मुंबईत असल्याचं खोटं सांगितले होते. परंतु ATS आणि NIA च्या तपासात वाझेचे खोटं उघड झालं. दोन्ही तपास यंत्रणांना मिळालेल्या CCTV फुटेजमुळे सचिन वाझेच सत्य लोकांसमोर आलं.
6 / 10
CCTV फुटेजप्रमाणे सचिन वाझे ४ मार्चला रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी कळवा रेल्वे स्थानकावर पोहचला होता. तिथे उतरल्यानंतर रेल्वे स्टेशनबाहेर रुमाल विकणाऱ्याकडून त्याने अनेक रुमाल खरेदी केले होते.
7 / 10
तपास यंत्रणांना संशय होता की, या रुमालात कदाचित क्लोरोफार्मचा वापर करून मनसुख हिरेन यांना बेशुद्ध करण्यात आलं असावं. मात्र हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानंतर त्यांच्या तोंडात कोंबलेले रुमाल कलिना येथील फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले होते.
8 / 10
फॉरेन्सिक लॅबने पाठवलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं की, या रुमालामध्ये कोणत्याही प्रकारचं क्लोरोफार्मचे घटक सापडले नाहीत. कलिना येथे ६ रुमाल पाठवण्यात आले होते. NIA सध्या दुसरा पर्याय जाणून घेण्यासाठी हे सर्व रुमाल पुण्यातील सेंट्रल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले आहेत. त्याचा रिपोर्ट अद्याप मिळाला नाही.
9 / 10
या प्रकरणात निलंबित एपीआय सचिन वाझे, निलंबित कॉन्स्टेबल विनायक शिंदे, क्रिकेट बुकी नरेश गोर आणि निलंबित एपीआय रियाजुद्दीन काजी जेलमध्ये आहेत तर निलंबित अधिकारी सुनील माने सध्या NIA च्या कस्टडीत आहे.
10 / 10
सुनील माने हा मुंबईतील कांदिवली गुन्हे शाखा कक्ष ११ मध्ये पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होता. वाझे प्रकारणानंतर त्याची सशस्त्र पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन यांना हत्येच्या दिवशी विनायक शिंदे नाही, तर सुनील माने यानेच फोन करुन बोलावलं होतं. सुनील माने मनसुख हिरेन यांच्या हत्येवेळी घटनास्थळी उपस्थित असल्याचंही एनआयएने कोर्टात सांगितलं.
टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेMansukh Hirenमनसुख हिरणMukesh Ambaniमुकेश अंबानीNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा