मुस्कान आणि साहिल तुरुंगात ड्रग्जसाठी हताश, एकमेकांसोबत राहण्याची इच्छाही व्यक्त केली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 19:00 IST
1 / 9Meerut Murder Case: मेरठमधील सौरभ राजपूत हत्याकांडातील दोन्ही आरोपी मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला तुरुंगात आहेत. दोन्ही आरोपींना गंभीर ड्रग्ज व्यसन आहे, तुरुंगात ड्रग्ज मिळत नसल्यामुळे दोन्ही आरोपी अस्वस्थ आहेत. दोन्ही आरोपी खाण्या पिण्यास नकार देत आहेत.2 / 9पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुस्कानने तुरुंगात सरकारी वकिलाची मागणी केली आहे. सरकारी वकिलाची व्यवस्था करण्यात येत आहे. हत्येच्या आरोपानंतर, कुटुंब मुस्कानला पाठिंबा देत नाही. मुस्कानला वकील देण्यात आलेला नाही.3 / 9१९ मार्च रोजी मेरठ जिल्हा तुरुंगात पोहोचल्यापासून दोघांनाही वेगवेगळ्या बॅरेकमध्ये सुमारे १.५ किलोमीटर अंतरावर ठेवले आहे. वरिष्ठ तुरुंग अधीक्षक विरेश राज शर्मा यांनी सांगितले की, त्यांनी जवळच राहण्याची विनंती केली होती. पण त्यांची मागणी नाकारण्यात आली आहे. कारण तुरुंग व्यवस्थेनुसार, पुरुष आणि महिला कैद्यांना एकत्र ठेवले जात नाही.4 / 9पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या वैद्यकीय तपासणीत तो ड्रग्ज व्यसनी असल्याचे उघड झाले. अशा परिस्थितीत त्यांना व्यसनातून मुक्त होण्यासाठी औषधे दिली जात आहेत. त्यांच्यावर व्यसनमुक्ती केंद्रांद्वारे उपचार आणि समुपदेशन केले जात आहे. त्यांना योग आणि ध्यानासाठी देखील पाठवले जात आहे.5 / 9वरिष्ठ तुरुंग अधीक्षक विरेश राज शर्मा म्हणाले, सामान्य कैदी त्यांच्यापासून दूर राहावेत आणि त्यांच्या केसेसबद्दल वारंवार विचारू नयेत यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. जेणेकरून त्यांचे नैराश्य आणि निराशेचे प्रमाण कमी होईल. त्याच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जात आहे.6 / 9अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोघेही नियमितपणे इंजेक्शनद्वारे औषधे घेत होते. यामुळे त्याला आता गंभीर व्यसनाचा सामना करावा लागत आहे. आरोपींची काळजी कारागृहातील व्यसनमुक्ती केंद्रात घेतली जात आहे. या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.7 / 9हे प्रकरण मेरठच्या ब्रह्मपुरी पोलीस ठाणे परिसरातील आहे. मुस्कान राजपूत येथे भाड्याच्या घरात राहत होती. तिच्यावर आणि तिचा प्रियकर साहिलवर तिचा पती सौरभ राजपूत यांची निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे. हत्येनंतर, सौरभच्या मृतदेहाचे तीन तुकडे करून एका निळ्या ड्रममध्ये टाकण्यात आले आणि नंतर ते सिमेंटने भरण्यात आले.8 / 9४ मार्च रोजी झालेला ही हत्या १८ मार्च रोजी उघडकीस आली. हत्येनंतर दोन्ही आरोपी शिमलाला गेले होते, असे सांगण्यात आले. कोणालाही हत्येचा संशय येऊ नये म्हणून, मुस्कानने 'तिचा मृत पती सौरभचा फोन सोबत घेतला होता' आणि त्याच्या नातेवाईकांशी 'चॅटिंग' देखील करत होती.9 / 9मुस्कान आणि साहिल दोघांवरही हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.