शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

लिव्ह इनमध्ये राहण्यासाठी बॉयफ्रेंडच्या घरी गेली, काही महिने एकत्र चांगले गेले...; पोलीस आले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2022 12:05 IST

1 / 5
उत्तर प्रदेश हे राज्य गुन्ह्यांची राजधानी बनली आहे. एकापेक्षा एक असे कधी न ऐकलेले गुन्हे याच राज्यात घडत असतात. इटावा शहरामध्ये बॉयफ्रेंडसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत विचित्र प्रकार घडला आहे. या मुलीचा आपबीतीचा व्हिडीओ येनकेनप्रकारे पोलिसांपर्यंत पोहोचला आणि तिची बंदिस्त खोलीतून सुटका झाली आहे.
2 / 5
इटावा नगरपालिका परिसरातील ही घटना आहे. राणी बागमधून पोलिसांनी एका अल्पवयीन तरुणीची सुटका केली आहे. तिला तिच्या बॉयफ्रेंडने आणि त्याच्या वडिलांनी गेल्या काही महिन्यांपासून घरात बंदिस्त केले होते, असा आरोप या तरुणीने केला आहे. यावेळी बॉयफ्रेंडने तिचे लैंगिक शोषण केले आणि मारहाणही करण्यात आल्याचे तिने म्हटले आहे.
3 / 5
पोलिसांनुसार इटावामध्ये राहणारा तरुण मध्य प्रदेशच्या इंदौरमध्ये नोकरी करत होता. यावेळी त्याची या अल्पवयीन तरुणीशी ओळख झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. एके दिवशी तो तरुण प्रेयसीला घेऊन इटावाच्या घरी आला. तिथेच दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले.
4 / 5
अल्पवयीन तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे आम्हाला मिळाला. तो शेजारणीने रेकॉर्ड केला होता. ही तरुणी गेल्या ८ महिन्यांपासून या तरुणाच्या घरी राहत होती. आरोपी तरुणाने तिला आमिष दाखवून फसवून इटावाला पळवून आणले होते. सुरुवातीचे काही महिने सारे काही ठीक चालले, नंतर तिला आरोपी आणि त्याचे कुटुंबीय मारहाण करू लागले. तिच्या घरातल्यांशी बोलूही दिले जात नव्हते, असा आरोप तरुणीने केल्याचे पोलिसांनी सांगितले.
5 / 5
तरुणीचा व्हिडीओ आल्यानंतर पोलिसांनी तिची सुटका केली. तिच्या कुटुंबाची माहिती मिळविली जात आहे. तिला ज्यांनी कोंडले होते, त्या आरोपी तरुणाला आणि त्याच्या पित्याला ताब्यात घेण्यात आले आहे. व्हिडीओ बनविण्यामागचा उद्देश काय याचीही चौकशी केली जात आहे. तरुणी तिच्या मर्जीने तरुणासोबत आली होती, लग्न न करताच ती त्याच्यासोबत राहत होती, हे चौकशीत समोर आल्याचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक जयप्रकाश सिंह यांनी म्हटले आहे.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश