Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 11:46 IST
1 / 11राजा रघुवंशची हनिमून ट्रिपवर क्रूरपणे हत्या करण्यात आली. पोलीस आणि न्यायालयीन तपासात असं सिद्ध झालं आहे की, राजाची हत्या त्याची पत्नी सोनम रघुवंशी आणि तिचा बॉयफ्रेंड राज कुशवाह यांनी केली होती.2 / 11मेघालयातील डोंगराळ भागात झालेल्या या पूर्वनियोजित हत्येने सर्वांनाच मोठा धक्का बसला. हत्येनंतर सोनमने पुरावे नष्ट करण्यासाठी रक्ताने माखलेलं हत्यार कापड किंवा कागदाने नव्हे तर आजूबाजूच्या जंगलातील गवताने पुसलं. रक्ताचे डाग साफ केले. 3 / 11पोलीस तपास आणि आरोपपत्रातून असं दिसून आलं की, सोनम तिच्या लग्नानंतरही तिचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या संपर्कात होती. दोघांनी इंदूरमध्ये राजा रघुवंशीची हत्या करण्याची योजना आखली.4 / 11सुरुवातीला सोनमने हनिमून ट्रिप दरम्यान गायब होण्याची योजना आखली. राज कुशवाहने राजाची हत्या करण्यासाठी त्याचे मित्र विशाल सिंह चौहान उर्फ विकी, आकाश राजपूत आणि आनंद कुर्मी या तीन जणांना तयार केलं.5 / 11सुरुवातीला राजाची हत्या आसाममध्ये करण्याचा प्लॅन होता. परंतु तो प्लॅन अयशस्वी झाल्यानंतर,मेघालयातील सोहरा (चेरापुंजी) येथे करण्याचा निर्णय घेण्यात आला. राजाच्या मानेवर ,खांद्यावर वार करून हत्या करण्यात आली. 6 / 11हत्येनंतर राजाच्या मृतदेह एका खोल दरीत फेकण्यात आला. हत्यारावरचे रक्ताचे डाग गवताने साफ करण्यात आले. यानंतर सोनमने राजाचा फोन तोडून टाकला, जेणेकरून लोकेशन ट्रेस होऊ नये. 7 / 11आकाशने त्याचा रक्ताने माखलेला पांढरा शर्ट काढला आणि तो दरीत फेकून दिला. सोनमने प्रवास खर्चासाठी विक्कीला २०,००० रुपये दिले आणि ती बुरखा घालून आधी शिलाँगकडे पळून गेली.8 / 11इंदूरला पोहोचलेली सोनम रघुवंशी ३-४ दिवस राज कुशवाहाच्या घरी राहिली कारण त्याची आई आणि बहीण घरात नव्हती. ३-४ दिवसांनी राज तिला इंदूरच्या देवास नाका येथील भाड्याच्या फ्लॅटमध्ये घेऊन गेला. 9 / 11राजने त्यानंतर तिला एक नवीन सिम कार्ड दिलं, जे तिने तिच्या मोबाईलमध्ये टाकलं. चौकशीदरम्यान सोनमने सांगितलं की, फ्लॅटमध्ये लपून राहायची आणि १४ दिवस टीव्हीवर सुरू असणाऱ्या सर्व बातम्यांवर लक्ष ठेवायची. 10 / 11सोनम राजा रघुवंशी आणि स्वतःच्या हत्येशी संबंधित अपडेट्स देखील पाहत असे. ती ही सर्व माहिती तिचा बॉयफ्रेंड राज कुशवाहाला पाठवत असे. याच दरम्यान राज अन्न आणि इतर आवश्यक वस्तू ऑनलाईन ऑर्डर करत होता आणि त्या सोनमला पोहोचवत होता.11 / 11सोनमने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आधी एक खोटी गोष्ट सांगितली. कसून चौकशी केल्यानंतर सोनम रघुवंशीला अटक करण्यात आली, तर राज कुशवाह आणि तिन्ही हल्लेखोरांना इंदूरमध्ये अटक करण्यात आली.