Sachin Vaze: सचिन वाझेला घेऊन NIA टीम CSMT, कळवा रेल्वे स्ठानकात; ‘त्या’ रात्री काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 09:27 IST
1 / 10निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला घेऊन NIA टीम सोमवारी रात्री उशीरा मुंबईतील CSTM रेल्वे स्टेशनवर पोहचली, प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांची गाडी ठेवल्याचं प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याकांडात सचिन वाझे आरोपी आहे. 2 / 10रात्री उशीरा NIA टीम क्राईम रिक्रिएट करण्यासाठी सचिन वाझेला रेल्वे स्टेशनला घेऊन गेली, याठिकाणी CCTV फुटेजसह इतर पुरावे गोळा करण्यासाठी वाझेला प्लॅटफॉर्म क्रमांक ४ आणि ५ वर नेण्यात आलं. 3 / 10यावेळी फॉरेन्सिक टीमदेखील उपस्थित होती, ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सचिन वाझेला गाडीत बसवून पुन्हा NIA ने कळवा स्टेशनला नेलं. मनसुख हिरेन हत्येच्या दिवशी सचिन वाझेने रेल्वेतून प्रवास केल्याचा NIA ला संशय आहे. त्यामुळे वाझेला स्टेशनला घेऊन गेले होते. 4 / 10रात्री १० च्या सुमारास सचिन वाझेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला घेऊन गेले. याठिकाणी पुणे फॉरेन्सिक विभागाची टीम आधीच हजर होती. यावेळी रेल्वे स्टेशनवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता. 5 / 10ज्या दिवशी मनसुख हिरेनची हत्या करण्यात आली तेव्हा सचिन वाझेने पोलीस मुख्यालयातून टॅक्सीने रेल्वे स्टेशन गाठलं होतं. वाझेने CSTM ते कळवा असा लोकलने प्रवास केला. या कालावधी मनसुख हिरेनला फोन करून घोडबंदर येथे भेटण्यास सांगितले होते. 6 / 10सहआरोपी विनायक शिंदेच्या मदतीने सचिन वाझेने मनसुख हिरेनची हत्या करून त्यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत फेकल्याचा संशय NIA ला आहे. याचवेळी सचिन वाझेने दक्षिण मुंबईतील एका बारवर रेड टाकल्याचा बनाव करण्यात आला होता. 7 / 10Crime Recreation करताना माध्यम प्रतिनिधींना शूट करण्यास मनाई करण्यात आली होती. सचिन वाझेला प्लॅटफोर्मवर घेऊन जात तिथे जिना चढणे आणि उतरणे हे करायला लावले. या सगळ्या हालचाली NIA ने कॅमेऱ्यात रेकॉर्ड केल्या आहेत. 8 / 10CSTM मधून NIA च्या अधिकाऱ्यांनी सचिन वाझेला कळवा रेल्वे स्ठानकात आणले. इथेही सचिन वाझेची परेड घेण्यात आली. विविध पद्धतीने चालायला लावून NIA ने व्हिडीओ रेकॉर्ड केला. मध्यरात्री २ पर्यंत सचिन वाझेचं क्राईम रिक्रिएशन करून NIA कार्यालयात आणलं.9 / 10 शनिवारी विशेष न्यायलयाने सचिन वाझेची NIA ची कोठडी ७ एप्रिलपर्यंत वाढवली आहे. सचिन वाझे प्रकरणात NIA ने एका महिलेलाही अटक केली आहे. ही महिला वाझेसोबत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये दिसली होती. या महिलेच्या माध्यमातून वाझे वसुलीच्या पैशांचा हिशोब ठेवत असल्याचा NIA चा दावा आहे. 10 / 10आतापर्यंत याप्रकरणात अनेक आलिशान कार NIA ने जप्त केल्या आहेत. त्यानंतर आता याप्रकरणात स्पोर्टस बाईक देखील NIA ने जप्त केल्याने नव्या दुचाकीची एन्ट्री झाली आहे. दमणमधून ही बाईक NIAने जप्त केली. ही स्पोर्टस बाईक मीना जॉर्ज या मिस्ट्री वुमनच्या नावावर आहे. ही स्पोर्टस बाईक बेनेली कंपनीची आहे. या स्पोर्टस बाईकची किंमत जवळपास 7 लाख 16 लाख इतकी आहे.