भयंकर! ...अन् 'तो' किरकोळ वाद ठरला जीवघेणा; पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; परिसरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 16:10 IST
1 / 12पती-पत्नीमध्ये काही कौटुंबिक कारणांवरून वाद झाल्याचा घटना या सातत्याने समोर येत असतात. पण त्यातील काही भांडणं ही काहीवेळेस विकोपाला ही जातात. अशीच एक घटना बिहारमध्ये घडली आहे. 2 / 12बिहारच्या सीवानमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीने आधी आपल्या पत्नीची हत्या केली आणि टोकाचं पाऊल उचललं आहे. स्वत:ही राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 3 / 12पती-पत्नीमध्ये नेहमीच विविध कारणांवरून भांडणं व्हायची अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली आहेत. मात्र पती अशा प्रकारे टोकाचं पाऊल उचलेल असा कोणीही कधीच विचार केला नव्हता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.4 / 12मिळालेल्या माहितीनुसार, बसंतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही खळबळजनक घटना घडली. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बसांव गावातील राजेश राय (42) याचे आपली पत्नी रामकली देवी हिच्यासोबत नेहमीच घरगुती वाद व्हायचे. 5 / 12सोमवारी सकाळीही दोघांमध्ये कोणत्या तरी कारणावरून किरकोळ वाद झाला. रागाच्या भरात त्याने आपल्या पत्नीची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.6 / 12गळफास घेण्यापूर्वी राजेश याने स्वतःच्या पोटावर वार केले होते. त्याच्या शरीरावर वार केल्याच्या काही खुणा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 7 / 12पोलीस उपअधीक्षक आणि बसंतपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी आशुतोष कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची माहिती ग्रामस्थांनी आम्हाला दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले. पंचनामा केला. 8 / 12दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मृत दाम्पत्याला चार मुले आहेत. त्यात तीन मुले आणि एक मुलगी आहे. ती मुले आपल्या आजीच्या घरी गेली आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 9 / 12राजस्थानच्या जोधपूरमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. नशेत असलेल्या पतीने धारदार शस्त्राने आपल्या पत्नीचं नाक आणि ओठ कापल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. 10 / 12धक्कादायक बाब म्हणजे दारूसाठी पत्नीने पैसे दिले नाहीत म्हणून नवराने टोकाचं पाऊल उचलत पत्नीवर अशा प्रकारे हल्ला केला आहे. यामध्ये जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 11 / 12महिलेने रुग्णालयातूनच पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली आहे. जोधपूरच्या प्रतापनगर परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 45 वर्षीय महिलेने स्वतः पोलिसांना याबाबत माहिती दिली. 12 / 12पती सकाळपासून रात्रीपर्यंत दारू पितो. संध्याकाळी त्याने दारूसाठी काही पैसे मागितले. तेव्हा महिलेने त्याला पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. यावरून तो प्रचंड चिडला आणि संतापाच्या भरात धारदार शस्त्राने त्याने तिच्या नाकावर आणि ओठांवर वार केले. यात ती गंभीर जखमी झाली.