शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'प्रियकराला भेटू देत नव्हता...' जूलीने पतीला कुऱ्हाडीने कापलं, जबाब ऐकून पोलिसही हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 13:42 IST

1 / 7
उत्तर प्रदेश सूबेच्या लखीमपूर खीरीमध्ये हत्येची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे एका पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून आपल्या पतीची हत्या केली. पत्नीने पतीला इतका वेदनादायी मृत्यू दिली की, बघणाऱ्यांचाच काय तर ऐकणाऱ्यांचाही थरकाप उडेल.
2 / 7
पत्नीने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीला कुऱ्हाडीने कापलं आणि त्याचा मृतदेह रोडच्या बाजूला नेऊन पुरला. 11 दिवसांनंतर मृतदेह सापडल्यानंतर या धक्कादायक हत्येचा खुलासा झाला.
3 / 7
पोलिसांनुसार, ही घटना पुरवा गावातील आहे. पोलिसांनी सांगितलं की, 11 दिवसांपासून बेपत्ता एका 28 वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळून आला होता. रस्त्यावर अजब दुर्गंधी येत होती. त्यामुळे लोकांनी याची सूचना पोलिसांना दिली. पोलिसांनी जेव्हा तिथे खोदलं तर त्यांना मृतदेह आढळून आला. नंतर हा तरूण बुद्धी पुरवा गावातील इंग्लिश असल्याचं समजलं.
4 / 7
गेल्या 11 दिवसांपासून तरूण बेपत्ता होता. कुटुंबिय त्याचा शोध घेत होते. पण त्याचा काही पत्ती लागला नाही. पोलिसांनी जेव्ही चौकशी सुरू केली तेव्हा त्यांना त्याची पत्नी जूलीवर संशय आला.
5 / 7
पोलिसांनी जेव्हा जूलीची चौकशी केली तेव्हा तिने सगळं काही सांगितलं. जूलीच्या तोंडून सत्य ऐकून पोलिसही हैराण झाले. इतकं ते खतरनाक होतं.
6 / 7
पोलिसांनी जेव्हा जूलीची चौकशी केली तेव्हा तिने सगळं काही सांगितलं. जूलीच्या तोंडून सत्य ऐकून पोलिसही हैराण झाले. इतकं ते खतरनाक होतं.
7 / 7
मृत तरूणाचे काका मेवालाल यांनी सांगितलं की, 11 दिवसांआधी त्यांचा पुतण्या घरातून बेपत्ता झाला होता. कुटुंबिय सतत त्याचा शोध घेत होते. पण त्याचा काही पत्ता लागला नाही. आता त्याचा मृतेदह सापडला आहे. त्याच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केला गेला होता. त्याच्या पुतण्याची हत्या केली गेली. पोलीस पुढील कारवाई करत आहे.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी