शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

पत्नी आणि मुलाने आधी तोंड शिवलं, नंतर दोराने बांधून रेल्वे ट्रॅकवर फेकलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 12:38 IST

1 / 8
झारखंडच्या पलामू जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. ६५ वर्षीय भोला राम बुधवारी सकाळी सिगसिगी रेल्वे कॅबिनजवळील ट्रॅकवर बांधलेला आढळून आला. त्याचं तोंडही शिवलेलं होतं.
2 / 8
पलामू जिल्ह्याच्या मंझलीघाट टोला गावात राहणारा भोला रामने घटनेसंबंधी पोलिसांना सांगितलं की, तो रात्री लघवी करण्यासाठी उठला होता. यावेळी त्याला काही लोकांनी पकडलं.
3 / 8
त्यानी सांगितलं की, त्यांची दुसरी पत्नी सविता देवीने पहिल्या लग्नातून झालेला मुलगा आणि इतर दोन व्यक्तींना सोबत घेऊन मला मारहाण केली.
4 / 8
यानंतर जबदस्तीने त्याचं तोंड शिवून त्याला रात्री साधारण ११ वाजता रेल्वे ट्रॅकवर दोराने त्याचे हात- पाय बांधून तिथेच सोडलं.
5 / 8
सकाळी साधारण पाच वाजता शौचास जात असलेल्या एका व्यक्तीला भोला राम रेल्वे ट्रॅकवर बांधलेला दिसला. त्यानंतर बरेच लोक तिथे जमा झाले.
6 / 8
गावातील लोकांनी दिलेल्या माहितीनंतर तिथे पोलीस पोहोचले. भोला रामला ते खाजगी हॉस्पिटलमद्ये घेऊन गेले. इथे भोला रामच्या तोंडाचा धागा काढण्यात आला. पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
7 / 8
पती-पत्नीच्या वादावरून ६ महिन्यांपूर्वी गावात पंचायत झाली होती. या पंचायतमध्ये पत्नीला कोणताही न्याय मिळाला नव्हता.
8 / 8
भोलाची पत्नी आणि मुलाने त्याच्यासोबत हा प्रकार केला होता. त्यांनी आधी भोला राम यांचं तोंड शिवलं आणि नंतर दोराने रेल्वे ट्रॅकवर बांधून सोडण्यात आलं. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर २०१० मद्ये भोलाचं दुसरं लग्न झालं होतं.
टॅग्स :JharkhandझारखंडCrime Newsगुन्हेगारी