By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 11:01 IST
1 / 10पारो, हे नाव आहे बिहार पोलीस दलातील अधिकारी गौतम कुमार यांच्या कथित मोलकरणीचा..नशीब असं की चक्क थारमधून घरकाम करायला येते. भेटवस्तू म्हणून बुलेट मिळाली. पारोचं नशीब पाहून अनेकजण थक्क झाले. किशनगंज सध्या प्रत्येकाच्या मुखी एकच नाव आहे ते एसडीपीओ गौतम कुमार यांचं...2 / 10गौतम कुमार प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. गौतम कुमारच्या काळ्या कमाईचा मार्ग जितका उघडला जात आहे तितकाच तो हैराण करणारा आहे. गौतम कुमार प्रकरणी त्याने भ्रष्ट मार्गाने कमावलेल्या कमाईचा तपासात पर्दाफाश होत आहे.3 / 10आतापर्यंत कथित प्रेयसी आणि पत्नीच्या नावे कोट्यवधीची संपत्ती असल्याचं समोर आले आहे. ताज्या माहितीनुसार, या प्रकरणात आणखी एक खुलासा झाला आहे. आता घरकाम करणारी मोलकरीणही कोट्यधीश असल्याचं उघड झाले. पारो नावाची ही मोलकरीण, एसडीपीओ गौतम कुमार याच्या घरात काम करते, जी लग्झरी लाईफस्टाइल जगत आहे.4 / 10माहितीनुसार, घरकाम करणारी पारो, चक्क थार वाहनातून घरकाम करायला यायची. इतकेच नाही तर तिच्याकडे रॉयल एनफिल्ड बुलेट बाइकही आहे. जी कथितपणे तिला गिफ्ट म्हणून देण्यात आली आहे. एका घरकाम करणाऱ्या महिलेचा शाही थाट पाहून तपास यंत्रणेतील अधिकारीही थक्क झाले.5 / 10तपास यंत्रणाची नजर पारोवर पडली, त्याआधीच ती कुटुंबासह फरार झाली आहे. तपास यंत्रणा आता तिच्या बँक खात्याची, संपत्ती, गुंतवणुकीची बारकाईने पडताळणी करत आहेत. गौतम कुमार आणि त्याच्याशी जवळीक साधणारे सगळे कोट्यधीश असल्याने हे संपूर्ण प्रकरण चर्चेत आले आहे.6 / 10पारोची लाईफस्टाइलचं सत्य सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. तिचे समोर आलेले फोटो, व्हिडिओ कधी बुलेटसोबत तर कधी रोकड हातात असलेले दिसून येतात. गौतम कुमार आणि त्यांच्या जवळच्या लोकांसोबत ती कायम नजरेस यायची. 7 / 10एका व्हिडिओत तर तिच्या हातात लाखोंची रोकड असल्याचे दिसते. एका फोटोत झेंडावंदनाच्या कार्यक्रमात ती अधिकाऱ्यांसोबत उभी असल्याचेही पाहायला मिळाले आहे. पश्चिम बंगालच्या सीमावर्ती भागात तिच्या नावावर आलिशान बंगलाही असल्याचं समोर आले आहे. त्याची किंमत कोट्यवधीची आहे. 8 / 10या प्रकरणातील सर्वात रंजक आणि धक्कादायक बाब म्हणजे एसडीपीओच्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीच्या नावावर कोट्यवधी रुपयांची मालमत्ता उघडकीस येत आहे. त्यांची पत्नी रुबी कश्यप, एका सरकारी शाळेतील शिक्षिका असून त्यांच्या नावावर एक आलिशान बंगला आणि महागड्या गाड्या आहेत. त्यांच्या कथित प्रेयसीच्या नावावरही मोठी गुंतवणूक असल्याचे समोर आले आहे.9 / 10या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या एका पथकाने शनिवारी किशनगंज शहरातील धर्मगंज येथील गौतम कुमारच्या घरकाम करणाऱ्या महिलेच्या भाड्याच्या घरावर धाड टाकली. ती महिला त्या घरात सापडली नाही. घराला कुलूप लावलेले होते. तपास पथकाने या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला. दुसऱ्या पथकानेही किशनगंज शहरातील धर्मगंज येथील एका ठिकाणाला भेट दिली. तिसऱ्या पथकानेही जिल्हा परिवहन कार्यालयाला भेट दिली.10 / 10३१ मार्च रोजी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने उत्पन्नाच्या तुलनेत अवाजवी मालमत्ता जमवल्याच्या प्रकरणी किशनगंजचे माजी एसडीपीओ गौतम कुमार यांच्या किशनगंज शहरातील धर्मगंज चौकातील शासकीय निवासस्थानावर छापा टाकला. ३२ वर्षांत १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची संपत्ती जमवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ही मालमत्ता अनेक शहरांमध्ये पसरलेली आहे.