1 / 6तेलंगाणाची राजधानी हैदराबादमध्ये एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडसाठी तब्बल 8 लाख 51 हजार रुपयांची चोरी केली. विशेष म्हणजे, या तरूनाने है पैसे आपल्याच कंपनीतून काढले. यानंतर, त्याने असा काही प्लॅन बनवला, की खुद्द पोलीसही विचारात पडले.2 / 6पीटीआय, या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण हैदराबादमधील आहे. घटनेतील आरोपी MBA असून येथील एका पेपर मिलमध्ये काम करतो. 3 / 6आरोपी तरुणाने 25 मेरोजी आपल्या कंपनीच्या वेगवेगळ्या एजन्ट्सशी संपर्क साधला. यानंतर त्यांने आपल्या सर्वच एजन्ट्सकडून तब्बल 8.51 लाख रुपये जमवले आणि हे पैसे घेऊन तो फरार झाला. 4 / 6यानंतर आरोपीनेच पोलिसात तक्रार दाखल केली, की काही लोकांनी त्याला लुटले आणि त्याच्याकडील सर्व पैसे हिसकावून घेतले. आरोपीच्या तक्रारीनंतर घटनेचा तपास सुरू झाला. यानंतर संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला.5 / 6पोलिसांनी सांगितले, की तपास सुरू झाल्यानंतर हळू-हळू संबंधित तरुणावर संशय वाढू लागला. यानंतर त्याने स्वतःच गुन्हा कबूल केला आणि संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून सर्व पैसे जप्त केले असून त्याला अटक केली आहे.6 / 6यावेळी पोलिसांनी सांगितले, की आरोपीची गर्लफ्रेंड अत्यंत आजारी आहे. तिच्यावर उपचार करण्यासाठी संबंधित तरुणाजवळ पैसे नाहीत. यामुळे संबंधित तरुणाने हा बनावट लुटीचा प्लॅन तयार केला होता.