शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लाजिरवाणा प्रकार! १२ वर्षाच्या चिमुरडीला ओलीस ठेवून घरमालकाच्या मुलासह मित्राने केला गँगरेप 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 6:01 PM

1 / 12
चार शहर का नाका परिसरात अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबासह भाड्याने राहत असलेल्या घराच्या मालकाच्या मुलानेच मित्रासह तिच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.
2 / 12
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. १२ वर्षांच्या चिमुरडीवर घरमालकाचा मुलगा आणि त्याच्या मित्रानेच सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे.
3 / 12
ग्वाल्हेरमधील ‘चार शहर का नाका’ या भागात पीडित 12 वर्षांची चिमुरडी आपल्या कुटुंबासह भाड्याच्या घरात राहत होती. पीडित मुलगी गेल्या आठवड्यात आपल्या खोलीतून बाहेर आली, तेव्हा घरमालकाचा मुलगा नीलू आणि त्याचा मित्र सत्यम तिथे होते.
4 / 12
दोघांनी मुलीचे तोंड दाबून तिला आपल्या खोलीत उचलून नेले. तिला जीवे ठार मारण्याची धमकी देत नीलूने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले, असा आरोप आहे. 
5 / 12
नीलूनंतर सत्यमनेही तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, मात्र इतक्यात घरात राहणारे इतर भाडेकरूंना जाग आली. संधीचा फायदा उचलत मुलीने आरोपींना धक्का दिला आणि पळ काढला.
6 / 12
आपल्या घराकडे धाव घेत तिने आपल्यासोबत झालेल्या अत्याचाराबाबत पालकांना माहिती दिली. त्यानंतर चिमुरडीला घेऊन कुटुंबीयांनी पोलीस स्टेशन गाठलं.
7 / 12
पोलिसांनी आरोपी नीलू आणि सत्यमविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
8 / 12
पोलिसांनी गांभीर्याने या गुन्ह्याची दखल घेत पीडितेच्या घरी धाव घेतली आणि आरोपी पसार होण्याआधीच त्यांना अटक केली.
9 / 12
पोलिसांनी सांगितले की आरोपींनी मुलीला ओलीस ठेवले आणि हा गुन्हा केला. 'भाडेकरू जागे झाल्यानंतर लोकांनी दोन्ही आरोपींना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
10 / 12
नंतर मुलीच्या कुटुंबियांच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला, असे' पोलिसांनी सांगितले.
11 / 12
मात्र, या घटनेने परिसरात खळबळ माजली असून अल्पवयीन मुलीवर ओळख असलेल्या व्यक्तींनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. 
12 / 12
दोन्ही आरोपींना अटक करुन पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती ग्वाल्हेरचे एसपी अमित सांघी यांनी दिली.
टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसPOCSO Actपॉक्सो कायदाArrestअटकMadhya Pradeshमध्य प्रदेश