Delhi Blast : जैशने २० लाख पाठवले तरी डॉक्टर एकमेकांशी भिडले? दिल्ली स्फोटाबाबत धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 12:14 IST
1 / 9दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोट प्रकरणात एजन्सी आता हवाला अँगलचा तपास करत आहे. फरीदाबादच्या अल-फलाह विद्यापीठात सुरू झालेलं 'व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल' आता समोर येत आहे. 2 / 9हवाला नेटवर्क आता विद्यापीठातून अटक केलेल्या आणि सध्या फरार असलेल्या डॉक्टरांशी जोडलेलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांच्या बँक खात्यांची चौकशी केली जात आहे, गेल्या काही महिन्यांत त्यांच्या खात्यांमध्ये झालेल्या ट्रान्झेक्शनची तपासणी केली जात आहे.3 / 9एजन्सी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एजन्सी डॉ. उमर, डॉ. मुझम्मिल आणि डॉ. शाहीन यांच्या ट्रान्झेक्शनची चौकशी करत आहे. सुरुवातीच्या तपासात २० लाख रुपयांचे पुरावे सापडले आहेत. त्यांना संशय आहे की, हे पैसे जैशच्या हँडलरकडून आले होते. जैशने हवालाद्वारे डॉक्टरांना हे पैसे पुरवले.4 / 9गुप्तचर यंत्रणेच्या सूत्रांनुसार, Fertilizer खरेदी करण्यासाठी अंदाजे ३ लाख रुपये खर्च करण्यात आले. उमर आणि डॉ. शाहीन यांच्यात पैशांवरून वाद झाल्याचं, ते एकमेकांशी भिडल्याचं देखील सूत्रांनी सांगितलं. 5 / 9तपास यंत्रणांना मुझम्मिलकडून ही मोठी माहिती मिळाली आहे. हे सर्व दहशतवादी मेवातमधील एजंटद्वारे दिल्ली हवाला नेटवर्कच्या संपर्कात आले. एजंटने त्यांना दहशतवादी निधीसाठी हवाला निधी पुरवला. 6 / 9एजंटने सर्वात आधी दहशतवादी डॉ. शाहीन, नंतर डॉ. मुझम्मिलशी संपर्क साधला आणि काही दिवसांपूर्वी त्यांनी दहशतवादी डॉ. उमरशी संपर्क साधला होता. सूत्रांनी सांगितलं की दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित आरोपी या पैशाचा वापर सर्व प्रकारच्या खर्चासाठी करत होते.7 / 9दिल्ली स्फोटांपूर्वी अमोनियम नायट्रेट, स्फोटांमध्ये वापरलेली कार, स्फोटकं आणि इतर उपकरणे खरेदी करण्यासाठी पैशाची आवश्यकता असल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलं. हा सर्व खर्च याच पैशातून केला. याचा अधिक तपास सुरू आहे. 8 / 9दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या कारस्फोटाच्या तपासात आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून 9mm कॅलिबरची तीन काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये दोन जिवंत काडतुसं आणि एका रिकाम्या बॉक्सचा समावेश आहे. 9 / 99mm कॅलिबर काडतुसं नागरी वापरासाठी प्रतिबंधित आहेत. याचाच अर्थ कोणताही नागरिक त्यांच्या कायदेशीर परवाना असलेल्या बंदुकीमध्ये ही काडतुसं वापरू शकत नाही. ही काडतुसं सामान्यतः सुरक्षा दल, पोलीस किंवा विशेष परवानगी असलेल्यांकडे असतात.