शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पोलीस अधिकाऱ्याच्या गलिच्छ कारनाम्यामुळे हादरलेले दिल्ली पोलीस दल

By पूनम अपराज | Published: October 26, 2020 9:13 PM

1 / 5
पोलीस उपनिरीक्षकाच्या कारनाम्याने काही मुली, स्त्रिया भयभीत झाल्या आहेत. या पोलीस उपनिरीक्षकाने आणखी बर्‍याच मुली व महिलांचा विनयभंग केला आहे. परंतु भीतीमुळे एफआयआर नोंदविला गेला नाही. (All Photos - Aaj tak)
2 / 5
विनयभंगाची सवय असलेला हा पोलीस उपनिरीक्षक शोधण्यासाठी दिल्ली पोलिसांनी 200 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची फुटेज त्यांनी तपासले. दिल्लीत 286 बालेनो कार आहेत, शोधलेल्या सर्व बलेनो मालकांचा डोझीअर पोलिसांनी बनविला.
3 / 5
करड्या रंगाच्या विना नंबरप्लेट बलेनो कारने पोलिसांचा गणवेश न परिधान करता सकाळी पोलीस उपनिरीक्षक अशा घटना घडवून आणत असत. ऑक्टोबरमध्ये त्याने द्वारका भागात सकाळी ८ ते रात्री ९ या वेळेत विनयभंगाच्या अनेक घटना घडवून आणल्या.
4 / 5
आरोपीला पकडण्यासाठी एसएचओ, एसीपी यांच्यासह दिल्ली पोलिसांचे सुमारे २०० पोलीस तैनात होते. शेवटी आरोपीला अटक केली गेली, तेव्हा तो दिल्ली पोलीस दलातील उपनिरीक्षक म्हणून बाहेर आला.
5 / 5
या पोलीस उपनिरीक्षकाविरूद्ध आणखी अनेक गुन्हे दाखल केले जाऊ शकतात, त्याच्या गुन्ह्यांची माहिती काढली जात आहे.
टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसMolestationविनयभंगdelhiदिल्ली