शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बंगळुरुत पत्नीची हत्या केली, मृतदेह बॅगेत भरला, औषध पिऊन साताऱ्याजवळ हायवेवर बसला अन्...; राकेश पोलिसांना असा सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 20:12 IST

1 / 10
बंगळुरुमधून आज एक धक्कादायक घटना समोर आली. ३२ वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये सापडला. पत्नीच्या हत्येनंतर पतीनेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.
2 / 10
आरोपी राकेश याने आपल्या पत्नीची हत्या करुन बॅगेत मृतदेह भरला होता. घराला कुलूप लावून तो मुंबईच्या दिशेने निघाला होता. आरोपीला साताऱ्याजवळ पोलिसांनी अटक केली.
3 / 10
राकेश राजेंद्र खेडेकर हा मुंबई येथून बंगळुरुमध्ये फेब्रुवारी २५ मध्ये आपली पत्नी गौरी हिचेसह बनारगट्टा तेजस्विनी नगर येथे राहण्यास गेला होता. राकेश हा कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर पदावर असून वर्क फ्रॉम होम करीत होता, तर त्याची पत्नी गौरी जॉब शोधत होती. २६ मार्च २०२५ च्या रात्री राकेशकडे पत्नी गौरीने पुन्हा मुंबईला जाण्याचा आग्रह धरला. या कारणाने त्या दोघांच्यामध्ये वाद झाला.
4 / 10
यावेळी पती राकेशने आपण फ्लॅटचे आताच डिपॉझिट दिले आहे. ते परत मिळणार नाही असं सांगितलं. आधीच खूप खर्च झाला आहे. यावेळी या दोघांच्यामध्ये टोकाचा वाद झाला. यावेळी पत्नीने पत्नीला चाकू दाखवून भीती दाखवली. याचाच मनात राग धरुन राकेशने पत्नीची हत्या केली.
5 / 10
गौरीचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच त्यानंतर राकेशने घरातील मोठी बॅग रिकामी करून त्यामध्ये पत्नी गौरीचे शव ठेवून बॅगेची चेन लावली व ती बॅग घराच्या बाथरूम बाहेर नेऊन ठेवली.
6 / 10
२७ मार्च २०२५ च्या रात्री १२ वाजता राकेश त्याचे साहित्य सोबत घेऊन त्याच्या मालकीची होंडा सिटी कार घेऊन जोगेश्वरी मुंबई येथे जाण्याकरता बंगळुरू येथून रवाना झाला.
7 / 10
पोलिसांच्या माहितीनुसार, मृत महिलेचा पती राकेश खेडेकर पत्नी गौरीची हत्या करून पुण्याला पळाला होता. तिथे पतीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हत्येच्या आरोपात त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर पुणे शहरातील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
8 / 10
राकेशने बंगळुरू येथील इमारतीमधील खालचे मजल्यावर राहणाऱ्या इसमाला फोन करून पत्नीच्या खुनाबाबत व बॅगेत मृतदेह ठेवल्याची माहिती दिली. त्यानंतर पुढे खंडाळा घाट उतरल्यावर शिरवळ येथील निप्रो कंपनीजवळील हायवे रोडवर राकेश कार घेऊन आला. त्याला केलेल्या खुनाचे टेन्शन आल्याने त्याने विकत घेतलेले सर्व कीटकनाशक व औषधे एकत्र करुन प्यायले.
9 / 10
यावेळी राकेशला त्रास होऊ लागल्याने राकेश कारमधून बाहेर येऊन रस्त्यावर बसला. राकेशला पाहून एका मोटरसायकल स्वाराने त्याची विचारपूस केली. त्यावेळी, आपण फिनाईल पिल्याचे सांगितल्याने दुचाकी स्वाराने त्याला तात्काळ त्याच्या कारमधून शिरवळ येथील जोगळेकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले. त्याठिकाणी अगोदरच हजर असलेले शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार कुंभार यांनी राकेशकडे काय झाले याबाबत विचारणा केली असता राकेशने त्याच्या पत्नीच्या खूनाबाबतचा प्रकार सांगितला. यावेळी पोलिसांनी राकेशला ताब्यात घेतले.
10 / 10
यावेळी पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी जोगळेकर हॉस्पिटलमधून आवश्यक माहिती घेऊन पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख यांना ही माहिती दिली. पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ बंगळुरू येथे संपर्क करून गौरीच्या खुनाबाबत खात्री केली.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसKarnatakकर्नाटकsatara-acसातारा