Crime News: सौंदर्याचा हनिट्रॅप, बिझनेसमनकडून लाखो उकळले, अखेर अशी अडकली प्रसिद्ध यूट्युबर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 09:12 IST
1 / 6दिल्लीतील प्रख्यात यूट्युबर नामरा कादिर हिला एका उद्योगपतीला हनिट्रॅपमध्ये अडकवून ८० लाख रुपये वसूल केल्याप्रकरणी आणि बलात्काराच्या खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. कोर्टाने तिला पोलीस कोठडीत पाठवलं आहे.2 / 6पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नामरा कादिर हिने एका २१ वर्षीय व्यावसायिकाला लग्नाचे आमिष दाखवून त्याच्यासोत शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडित तरुणाने पोलिसांत जाऊन तक्रार दिली होती. त्यानंतर नामरा कादिर हिने अंतरिम जामिनासाठी कोर्टात धाव घेतली होती. 3 / 6२२ वर्षीय नामरा कादिर हिचे वेगवेगळ्या व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्मवर सहा लाखांहून अधिक सब्स्क्रायबर्स आहेत. तिला अटक करण्यात आली तेव्हा लोकांना विश्वास बसला नाही. 4 / 6नामरा हिने तिच्या पतीसोबत मिळून गुरुग्राममधील एका बिझनेसमनला आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अडकवण्याची धमकी देऊन ७८ लाख रुपयांहून अधिकची रक्कम वसूल केली होती. 5 / 6गुरुग्राम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नामरा कादिर हिने या व्यावसायिकासोबत शरीरसंबंध प्रस्थापित करताना काही फोटो आपल्या फोटोमध्ये रेकॉर्ड केले होते. त्यावरून या व्यावसायिकाला बलात्काराच्या आरोपाखाली अडकवून धमकी दिली. तसेच त्याच्याकडून लाखो रुपये वसूल केले होते. अखेर पीडिताने तक्राद दिल्यानंतर पोलिसांनी तिच्या मुसक्या आवळल्या. 6 / 6पोलिसांनी सांगितले की, कादिर हिने तिचा गुन्हा कबूल केला आहे. तसेच पीडिताकडून घेतलेले पैसे आणि इतर सामान जप्त करण्यासाठी पोलिसांनी तिला रिमांडमध्ये घेतले आहे. तिचा पती आणि सहआरोपी मनीष ऊर्फ विराट बेनीवाल याला लवकरच अटक करण्यात येईल.