By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 20:23 IST
1 / 9सध्या ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सर्रास वाढले आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून किंवा पैशांचे आमिष दाखवून फोनकॉलद्वारेच लूट केली जाते. 2 / 9देशात कोरोनाचे 2 डोस घेतलेल्या नागिरकांना आता बुस्टर डोस देण्यात येत आहे. मात्र, या बुस्टर डोसच्या नावाने फोन करुन नागरिकांची लूट होत असल्याचं समोर आलं आहे. 3 / 9सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव, डीवायएसपी राजश्री पाटील यांनी सायबर हॅकिंगचे गुन्हे टाळण्यासाठी जनजागृतीच्या सूचना ग्रामीण पोलिसांना दिल्या आहेत. 4 / 9लसीकरणाच्या नावावर फसवणुकीच्या या नवीन प्रकारात हॅकर कॉल करीत फोनवरील व्यक्तीस त्याच्या लसीकरणाची अचूक तारीख सांगून बूस्टर डोससाठी विनंती करीत डोस नोंदणीच्या नावावर ओटीपी पाठविला जातो. 5 / 9तो ओटीपी विचारतो. ओटीपी दिल्यानंतर संबंधितांचे बँक खाते हॅक करीत रक्कम काढून घेतो. म्हणून नागरिकांनी सतर्क राहावे6 / 9बूस्टर डोससाठी मोबाइलवर येणारे कॉल फसवे आहेत. तुम्हाला कोणी डोससाठी विनंती करीत असेल अथवा ओटीपी पाठविला असेल, तर त्याला प्रतिसाद देऊ नका. 7 / 9हा हॅकिंगचा नवीन फंडा आहे. शहरासह ग्रामीण भागात स्थानिक पोलिसांना अशा प्रकारचे गुन्हे टाळण्यासाठी जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या आहेत.8 / 9नागरिकांनी सतर्क राहावे. पोलिसांना कळवावे, असे आवाहनही पोलीस अधिक्षक तेजस्वीनी सातपुते यांच्यासह पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी केले आहे.9 / 9नागरिकांनी बुस्टर डोसच्या नादात काळजी घ्यावी, अन्यथा आपली फसवणूक होऊ शकते