शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

व्हेलेंटाईन डेच्या आधीच जिवंत जाळले; पेटत्या प्रेयसीने मारली मिठी, प्रियकराचा होरपळून मृत्यू

By पूनम अपराज | Published: February 08, 2021 8:15 PM

1 / 7
महत्वाची बाब म्हणजे प्रियकराने पेट्रोल टाकून प्रेयसीला पेटवून दिले. पेटलेल्या अवस्थेत प्रेयसीने प्रियकराला मिठी मारली, त्यामुळे प्रियकराचा मृत्यू झाला आहे.
2 / 7
मुंबई उपनगरातील जोगेश्वरी परिसरातील मेघवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गांधीनगर परिसरात ही घटना घडली आहे. विजय खांबे (३०) असं मृत तरुणाचे नाव आहे. विजयचे आपल्या मेव्हण्याच्या धाकड्या बहिणीशी गेल्या अडीच वर्षांपासून प्रेमसंबंध होते.
3 / 7
विजयला त्याच मुलीशी लग्न करायचे होते. यासाठी त्याने लग्नाचा प्रस्ताव देखील मुलीच्या कुटुंबीयांना पाठवला होता. मात्र, त्याचा हा प्रस्ताव मुलीच्या आई-वडिलांनी फेटाळून लावला. विजयला दारू पिण्याचे व्यसन जडले होते. त्यामुळे काही दिवसांनी मुलीनेही विजयशी लग्न करण्यास नकार दिला होता.
4 / 7
त्यानंतर विजय मुलीला लग्न करण्यास जबरदस्ती करत होता, तसेच तो तिला त्रास देखील देत होता. विजयच्या त्रासाला कंटाळून मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. रुग्णालयात आठवडाभर  उपचार घेतल्यानंतर मुलगी घरी आली होती.
5 / 7
नंतर विजय पुन्हा तिला भेटण्यासाठी गेला. त्यावेळी त्याने आपल्यासोबत पेट्रोलची बाटली आणली होती. मुलगी घरी एकटीच असल्यामुळे विजयने संधी साधून घरात प्रवेश केला. विजय आणि मुलीमध्ये पुन्हा वादंग निर्माण झाला. त्यानंतर त्याने आपल्यासोबत आणलेली पेट्रोलची बाटली पीडितेच्या अंगावर ओतली आणि पेटवून दिले. तरुणी जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा करत होती, मात्र विजय हा दारातच उभे राहून सर्व पाहत होता.
6 / 7
काही वेळानंतर तरुणीने पळत जात विजयला मिठी मारली. विजयने स्वत:ला सोडवण्याचा प्रयत्न केला पण तरुणीने त्याला काही सोडले नाही. दोघेही पेटलेल्या अवस्थेत घराच्याबाहेर आले आणि खाली कोसळले. त्यानंतर शेजाऱ्यांनी धाव घेऊन आग विझवली. दोघांनाही तातडीने जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आगीत होरपळून विजय ९० टक्के भाजला होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
7 / 7
तर पीडित तरुणीची प्रकृती चिंताजनक असून मृत्यूशी झुंज देत आहे. पीडित मुलीच्या भावाच्या तक्रारीवरुन मेघवाडी पोलीस स्टेशनमध्ये विजय खांबेविरोधात हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिसMumbaiमुंबई