मुलानेचं रचला स्वतःच्या अपहरणाचा कट; बापाकडे मागितली ५० लाखांची खंडणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 20:41 IST
1 / 8मुलाच्या वडिलांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तपासादरम्यान आरोपी विद्यार्थी व त्याच्या मित्रांविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.2 / 8आरोपी विद्यार्थी 12 वीचा विद्यार्थी आहे. विद्यार्थ्याच्या कुटूंबाच्या म्हणण्यानुसार, 21 सप्टेंबर रोजी तो काहीही न सांगता घरातून बेपत्ता झाला. त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा बराच शोध घेतला. 3 / 8त्यानंतर त्याचा काहीच पत्ता सापडला नाही. आरोपी विद्यार्थ्याच्या वडिलांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली आणि गुन्हा नोंदविला.4 / 8मुलाच्या वडिलांनी सांगितले की, आपला मुलगा शेवटचा खेड्यातील मुलांबरोबर दिसला होता आणि त्याच दिवशी ते दोघेही बेपत्ता होते.5 / 8मुलाच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, बेपत्ता विद्यार्थी आणि त्याच्या मित्रांनी 25 सप्टेंबर रोजी वडिलांना फोन केला आणि म्हणाला, 'जर तुम्हाला मुलगा सुरक्षितपणे परत यायचा असेल तर 50 लाख रुपयांची व्यवस्था करा. यानंतर त्याने वारंवार फोन करून खंडणीच्या पैशांची मागणी केली.6 / 8दरम्यान, मुलाच्या वडिलांनी खंडणीच्या फोनची माहिती पोलिसांना दिली असता, या प्रकरणातील तपास गुन्हे शाखा आणि सायबर सेलकडे सोपविण्यात आला.7 / 8खंडणीसाठी केलेल्या फोन नंबरच्या आधारे त्यांचे लोकेशन शोधले असता ते फरीदाबादमध्ये सापडल्याचे तपासात पोलिसांना आढळले. 8 / 827 सप्टेंबर रोजी पोलिस पथकाने विद्यार्थी आणि त्याच्या तीन साथीदारांना फरीदाबादमधील मिलान हॉटेलजवळ अटक केली. चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले की, त्याच्या वडिलांनी आपल्याला घराबाहेर पडू दिले नाही किंवा पॉकेट मनी दिले नाहीत, म्हणून त्याने आणि त्याच्या साथीदारांनी हा कट रचला.