शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

सेनेतील जवानाच्या प्रेमात पडली विवाहित महिला, पतीला घटस्फोट देऊन केलं दुसरं लग्न आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 15:01 IST

1 / 10
बिहारच्या छपरामधून एका विवाहित महिलेची अजब लव्हस्टोरी समोर आली आहे. ही महिला सेनेच्या जवानाच्या प्रेमात पडली. त्यानंतर महिलेने पतीला घटस्फोट दिला आणि सेनेच्या जवानासोबत लग्न केलं. आश्चर्याची बाब म्हणजे सेनेच्या जवानाचं आधीच लग्न झालेलं होतं. पण तरी त्याने दुसरं लग्न केलं आणि एका मुलीची वडील झाला. लग्नाच्या एक वर्षानंतर आता सेनेचच्या जवानाने दुसऱ्या पत्नीला आपल्या जवळ ठेवण्यास नकार दिला आहे.
2 / 10
ही घटना डुमरी छपिया गावातील आहे. डुमरी छपिया येथे राहणारा सुनील प्रसाद महतो सेनेत जवान आहे. उत्तर प्रदेशच्या शुल्कागंज गावात राहणाऱ्या ऐश्वर्या मिश्राने दावा केला की सुनील प्रसाद महतो तिचा पती आहे. ऐश्वर्याने सोमवारी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घडलेला प्रकार सांगितला.
3 / 10
ऐश्वर्याने सांगितलं की, सुनीलसोबत तिची पहिली भेट कानपूर आर्मी कॅंटीनमध्ये झाली होती. तिथे दोघांची ओळख झाली आणि नंतर दोघांमध्ये बोलणं सुरू झालं. दोघांची मैत्री प्रेमात बदलली. प्रेम इतकं वाढलं की, दोघांनी १६ फेब्रुवारी २०१९ ला कानपूरच्या एका मंदिरात लग्न केलं.
4 / 10
ऐश्वर्याचं आधी लग्न झालेलं होतं. पण तिने पतीपासून घटस्फोट घेतला होता. ऐश्वर्याचा पहिला पती प्रायव्हेट जॉब करत होता. घटस्फोटानंतर सुनील आणि ऐश्वर्या पती-पत्नीसारखे राहू लागले होते.
5 / 10
ऐश्वर्याचं घर कानपूरमध्येच होतं आणि आर्मी बेसही तिथेच होता. त्यामुळे दोघांच्या भेटीगाठी होत होत्या. सुट्टीच्या दिवशी सोबत राहत होते. यादरम्यान ऐश्वर्याने एका मुलीला जन्म दिला. ती आता २ वर्षाची आहे.
6 / 10
माला म्हणाली की, ऐश्वर्या आधीही माझ्या पतीला ब्लॅकमेल करत होती आणि आता माझ्याच घरी येऊन माझ्या पतीला आपला पती असल्याचा दावा करत आहे. आमच्यासोबत मारझोड करत आहे. मलाही तिने मारहाण केली. याबाबत मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दिली आहे.
7 / 10
जेव्हा ऐश्वर्याने याला विरोध केला तेव्हा सोबत घेऊन जाताना सुनील ऐश्वर्या आणि मुलीला चंडीगढ प्लॅटफॉर्मवर सोडून फरार झाला. यानंतर ऐश्वर्या १५ जुलैला डुमरी छपिया येथे पोहोचली. इथे तिला सुनीलच्या घरात प्रवेश दिला नाही.
8 / 10
सुनील महतोची पहिली पत्नी माला महतो याप्रकरणी म्हणाली की, तिचं लग्न २८ नोव्हेंबर २०१३ मध्ये झालं होतं. तेव्हापासून ती तिच्या पतीसोबत राहत आहे. तिला ४ वर्षांची एक मुलगी आहे. ती दीड वर्षापासून सासू-सासऱ्यांसोबत गावात राहत आहे. ऐश्वर्यामुळे २०१८ पासून तिच्यात आणि तिच्या पतीत वाद निर्माण झाला आहे.
9 / 10

10 / 10
माला म्हणाली की, ऐश्वर्या आधीही माझ्या पतीला ब्लॅकमेल करत होती आणि आता माझ्याच घरी येऊन माझ्या पतीला आपला पती असल्याचा दावा करत आहे. आमच्यासोबत मारझोड करत आहे. मलाही तिने मारहाण केली. याबाबत मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दिली आहे.
टॅग्स :Biharबिहारfraudधोकेबाजीmarriageलग्नCrime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश