दुसरे लग्न करून पती पोहचला पोलीस ठाण्यात, पहिल्या पत्नीने धू धू धरले अन् व्हिडिओ झाला व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2021 20:59 IST
1 / 5पोलिस ठाण्यातच या महिलेने आपल्या पतीला धडा शिकवत गोंधळ सुरू केला. या महिलेने आपल्या पतीला अशा प्रकारे मारहाण करण्यास सुरवात केली की, पती वाचविताना पोलिसांना देखील घाम फुटला. नवऱ्याला केलेल्या मारहाणीचा हा व्हिडिओ तिथे उपस्थित काही लोकांनी बनविला होता, जो आता व्हायरल होत आहे. (All Photos - Aaj Tak) 2 / 5 हे प्रकरण होशंगाबादच्या महिला पोलिस स्टेशनचे आहे. जेथे पती-पत्नीमधील वादाचा विषय चव्हाट्यावर आला. खरं तर इटारसी येथील रहिवासी चंद्रकांत रोहरने आपल्या पत्नीला कोर्टातुन घटस्फोट देऊन पुन्हा लग्न केले. घटस्फोटित महिला मालती रोहर यांनी घटस्फोट रोखण्यासाठी उच्च न्यायालयात अपील केले आहे.3 / 5 याचदरम्यान महिलेच्या लक्षात आले की, नवऱ्याने पुन्हा लग्न केले आहे. यानंतर महिलेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या तक्रारीनंतर दोन्ही पक्षांना पोलिस ठाण्यात बोलविण्यात आले. दोन्ही बाजूकडील पोलिसांसमोर बोलणे चालू होते, तेव्हा मालती संतापली.4 / 5 मालतीने काहीही न विचारता पतीवर हल्ला केला. त्या महिलेने सर्वांसमोर आपल्या नवऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांना हे पाहून ते घटनास्थळी धावले.5 / 5त्याच वेळी या प्रकरणात पतीने पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार केली नाही, त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही समजावून घरी पाठवले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तिथे उपस्थित काही लोकांनी बनविला होता, जो आता व्हायरल होत आहे.