८ वर्षाच्या मुलीचं केलं अपहरण; लैंगिक शोषण करून हत्येनंतर विहिरीत फेकला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 21:49 IST
1 / 7चिमुकलीचे लैंगिक शोषण करून त्यानंतर गळा आवळून खून केला. हैवानाची हद्द पार जेव्हा कोरड्या विहिरीत त्याने चिमुकलीचा मृतदेह फेकला (Photo - Dainik Bhaskar)2 / 7जंगलातील कोरड्या विहिरीत मृतदेह टाकून त्यावर मोठं मोठे दगड नराधमाने टाकून मृतदेह लपवण्याचा प्रयत्न केला. 3 / 7एक दिवसानंतर, गुरुवारी दहरा मोडमध्ये असलेल्या चोर पीपरीच्या जंगलातील विहीरीतून मुलीचा मृतदेह सापडला. आरोपी तीन मुलींचा पिता आहे.4 / 7वैद्यकीय प्रभारी डॉ. शशिकांत यांच्या म्हणण्यानुसार, मेडिकल बोर्डाने घेतलेल्या पोस्टमार्टममध्ये बलात्कार केल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच मुलीच्या हात पायांचे हाडे तुटलेले आढळले आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी खेडीदेवी सिंह येथे राहणार्या ३० वर्षीय कलुआ जाटव याला अटक केली आहे. तो त्या मुलीबरोबर कॅमेर्यामध्ये दिसला आहे.5 / 7सीओ ग्रामीण हरिराम मीणा यांनी सांगितले की, हिंडौन भागात राहणाऱ्या ८ वर्षाच्या पीडित मुलीचे वडील नदबई येथे मजूर म्हणून काम करतात.6 / 7तिसरीत शिकणारी त्यांची मुलगी, आईने बुधवारी दुपारी दुकानातून सामान घेण्यासाठी पाठविले. मात्र, ती संध्याकाळपर्यंत परतली नव्हती. आजूबाजूला बघितले पण ती काही सापडली नाही. संध्याकाळी वडील कामावरुन परत आले, तेव्हा पत्नीने त्यांना मुलीच्या घरी न आल्याबाबत सांगितले. त्यांनी खूप शोध घेतला. मात्र, कोठेही आढळून आले नाही. यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली.7 / 7निरागस वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मजुरांच्या निवासस्थानाजवळील ऑइल मिलच्या सीसीटीव्ही कॅमेर्याची झडती घेतली असता खेडीदेवी सिंह येथील रहिवासी राजेश जाटव त्यात मुलीसह दिसला. राजेशला अटक करुन चौकशी केली जात आहे. राजेश स्वत: तीन मुलींचा पिता आहे. तो व्यवसायाने मजूर असून मद्यपी आहे. तो अखेर मुलीबरोबर सीसीटीव्हीमध्ये दिसला होता. एफएसएल आणि एसडीआरएफ टीम घटनास्थळी दाखल झाली असून त्यांनी पुरावे गोळा केले.