क्षणभरात संपवलं ४ वर्षांचं प्रेम, प्रियकराचा काटा काढला; मृतदेहालाही सोडलं नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 21:23 IST
1 / 7हा तरुण १६ मार्चपासून बेपत्ता होता. २० मार्च रोजी दलनवाला येथे अल्पवयीन मुलगी देखील बेपत्ता झाली होती. (All Photo - Amar Ujala)2 / 7पहिल्या प्रियकराचा खून केल्यानंतर तरुणी दिल्ली आणि आसाममध्ये नव्या प्रियकरासह राहू लागली. रविवारी ती परत आल्यावर तिने बहिणीला सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तरुणीला ताब्यात घेतले आणि आरोपी तरुणाला अटक केली. 3 / 7दोघांनाही सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. रायपूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 20 मार्च रोजी पोलिस स्टेशनमध्ये 17 वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तिचा शोध घेण्यासाठी दोन पथके तयार केली आणि सहारनपूर, दिल्ली इत्यादी ठिकाणी तिचा शोध घेतला. सुमारे ३७ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही स्कॅन करण्यात आले. 4 / 7प्राथमिक तपासात या मुलीचे दालनवाला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आकाश नावाच्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस जेव्हा आकाशच्या घरी पोहोचले तेव्हा कळलं की आकाशही काही दिवसांपासून बेपत्ता आहे.5 / 7दरम्यान, रविवारी मुलगी घरी पोहोचली. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस बालकल्याण समितीच्या पथकासह तिच्या घरी पोहोचले. तेथे असे कळाले की, अल्पवयीन मुलीने आपल्या बहिणीला सांगितले की, तिने आकाशसोबत नरेंद्र उर्फ बंटी रहिवासी दालनवाला याची हत्या केली.6 / 7त्यावेळी आकाशही घरात उपस्थित होता. पोलिसांनी आकाशला ताब्यात घेऊन मुलीला बाल कल्याण समितीच्या ताब्यात दिले. चौकशीत आकाशने सांगितले की, त्याने नरेंद्र उर्फ बंटीचा बेल्टने गळा दाबून खून केला होता.7 / 7यानंतर आंबवला तारला जंगलातील खड्ड्यात मृतदेह पुरण्यात आला. 16 मार्च रोजीच नरेंद्रची हत्या झाल्याचेही चौकशीत उघड झाले आहे. त्यानंतर दोघेजण बसने हरिद्वार आणि नंतर दिल्ली आणि आसामला गेले.