शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

खुशखबर! आयटीबीपीमध्ये 12वी पास तरुणांसाठी बम्पर भरती, जाणून घ्या डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 9:11 PM

1 / 7
इंडो-तिबेट बॉर्डर पोलीसकडून (ITBP) नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आली आहे. ITBP ने हेड कॉन्स्टेबल (HC) आणि सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) पदाच्या 286 जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. (ITBP Recruitment 2022 Notification)
2 / 7
या पदांसाठी लवकरच अर्ज करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात येईल. या भरती प्रक्रियेच्या माध्यमाने डायरेक्ट एन्ट्री अँड लिमिटेड विभागीय स्पर्धा परीक्षेअंतर्गत (LDCE) एकूण 286 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासंदर्भात अर्ज करण्यासाठीची लिंक लवकरच ITBP ची अधिकृत वेबसाइट itbpolice.nic.in वर अॅक्टिव्ह होईल.
3 / 7
आवश्यक पात्रता आणि वयोमर्यादा - हेड कॉन्स्टेबल आणि सहाय्यक उपनिरीक्षक पदांसाठी इच्छुक असलेले उमेदवार, कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून 12वी उत्तीर्ण झालेले असावेत. याशिवाय उमेदवारांना हिंदी आणि इंग्रजी टायपिंगचे ज्ञान असावे.
4 / 7
काही पदांसाठीची वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे एवढी निश्चित करण्यात आली आहे, तर काही पदांसाठी कमाल वयोमर्यादा 35 वर्षे एवढी आहे. यासंदर्भात अधिक माहिती अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होईल.
5 / 7
निवड झालेल्या उमेदवाराला मिळेल एवढे वेतन - हेड कॉन्स्टेबलचे मासिक वेतन 25500 रुपये ते 81100 रुपयांदरम्यान असेल. तर एएसआयचे मासिक वेतन 29200 रुपये ते 93200 रुपयांदरम्यान असेल. याशिवाय वेळेनुसार, वेतन वाढ होत राहील. अधिक माहितीसाठी आपण या भरती प्रक्रियेसंदर्भातील नोटिफिकेशन पाहू शकता.
6 / 7
अशा पद्धतीने करता येईल अर्ज - या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना सर्वप्रथम आयटीबीपीची अधिकृत वेबसाईट itbpolice.nic.in वर जावे लागेल. येथे गेल्यानंतर, त्यांना Recruitment सेक्शनवर क्लिक करावे लागेल. यानंतर आपल्यासमोर या भरती संदर्भातील नोटिफिकेशन आणि अर्ज करण्यासाठी लिंक येईल. यावर आपल्याला क्लिक करावे लागेल.
7 / 7
अर्ज करण्यासाठी देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर, सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करा आणि यानंतर, आवश्यक दस्तएवज अपलोड करा. अर्जाचे शुल्क भरल्यानंतर, आपण फॉर्म फायनल सबमिट करू शकता.
टॅग्स :Career Guidanceकरिअर मार्गदर्शनStudentविद्यार्थीjobनोकरीBorderसीमारेषा