शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

तुमची पत्नी गृहिणी आहे आणि SIP चालवतेय, मग टॅक्स नक्की कोण भरणार? जाणून घ्या इन्कम टॅक्सचा महत्त्वाचा नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 10:22 IST

1 / 8
Husband Wife Investment: आजच्या डिजिटल युगात घरखर्चासाठी रोख रक्कम देण्याची पद्धत झपाट्यानं कमी झाली आहे. आता बहुतेक लोक UPI किंवा बँक ट्रान्सफरद्वारे दरमहा खात्यात पैसे पाठवतात. विशेषतः तेव्हा, जेव्हा पत्नी गृहिणी असते आणि घराचे संपूर्ण बजेट तीच सांभाळते.
2 / 8
पण जर खात्यात पाठवलेली रक्कम पत्नी एसआयपी (SIP) किंवा इतर ठिकाणी गुंतवत असेल, तर त्याचा टॅक्स कोण भरणार? अनेक लोक या नियमापासून अनभिज्ञ असतील, त्याबद्दल येथे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. कोणत्या परिस्थितीत टॅक्सची जबाबदारी पतीवर येते, कधी पत्नीला टॅक्स द्यावा लागू शकतो आणि कोणत्या गोष्टींची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे, पाहूया.
3 / 8
जर तुम्ही पत्नीला घरखर्च, वैयक्तिक गरजा किंवा दैनंदिन खर्चासाठी पैसे देत असाल, तर या रकमेवर कोणताही टॅक्स लागत नाही. हा पैसा भेट किंवा घरगुती खर्चाच्या श्रेणीत येतो. तुम्ही रोख पैसे द्या किंवा बँक ट्रान्सफर करा, जोपर्यंत त्याचा वापर खर्चासाठी होत आहे, तोपर्यंत आयकर विभागाच्या नजरेत हे टॅक्सेबल इन्कम मानलं जात नाही.
4 / 8
जर पत्नीला दिलेल्या पैशांतून ती एसआयपी (SIP) मध्ये गुंतवणूक करते, म्युच्युअल फंड किंवा एफडीमध्ये (FD) पैसे लावते, अथवा दुसऱ्या कोणत्याही बचत योजनेत गुंतवणूक करते, तर त्या गुंतवणुकीतून होणारी पहिली कमाई पतीचं उत्पन्न मानलं जाईल.
5 / 8
प्राप्तिकराच्या भाषेत याला 'क्लबिंग ऑफ इन्कम' (Clubbing of Income) असं म्हणतात. अशा परिस्थितीत टॅक्स पतीला भरावा लागेल. पत्नीला आयटीआर (ITR) फाईल करणे आवश्यक नाही.
6 / 8
आता खरा ट्विस्ट येथे येतो. जर पत्नीनं गुंतवणुकीतून मिळालेली कमाई पुन्हा कुठेतरी गुंतवली, तर त्या दुसऱ्या गुंतवणुकीतून मिळणारं उत्पन्न हे पत्नीचं स्वतःचं उत्पन्न मानलं जाईल. सोप्या शब्दात सांगायचे तर, एकदा केलेल्या गुंतवणुकीवरील कमाई पुन्हा गुंतवल्यास जे उत्पन्न मिळेल, त्या उत्पन्नाची गणना इयर ऑन इयर आधारावर पत्नीच्या उत्पन्नात जोडली जाईल. टॅक्स स्लॅबनुसार जर त्यावर आयकर आकारला गेला, तर तो पत्नीला भरावा लागेल आणि आयटीआर फाईल करणं आवश्यक असेल.
7 / 8
पत्नी गृहिणी असली तरीही, जर तिचे उत्पन्न टॅक्सेबल मर्यादेपेक्षा जास्त होत असेल, तर आयटीआर फाईल करणं आवश्यक आहे. अन्यथा दंड आणि नोटीस मिळण्याचा धोका असतो. म्हणूनच गुंतवणुकीतून होणाऱ्या प्रत्येक उत्पन्नाची योग्य नोंद ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
8 / 8
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
टॅग्स :Mutual Fundम्युच्युअल फंडSIPएसआयपीInvestmentगुंतवणूकMONEYपैसा