By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 07:21 IST
1 / 10सध्या सोन्या-चांदीचे कडाडलेले भाव आणि शेअर बाजारातील कमालीची अस्थिरता यामुळे सामान्य गुंतवणूकदारांच्या मनात संभ्रमाचे वातावरण आहे. गुंतवणुकीसाठी नेमका कोणता पर्याय निवडावा, असा प्रश्न अनेकांना सतावत आहे. 2 / 10या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांसाठी पाच महत्त्वाचे कानमंत्र... गेल्या काही महिन्यांत विविध 'असेट क्लास'मध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. त्यामुळे 'माझ्याकडे ३० हजार रुपये आहेत, मी चांदी घेऊ की शेअर बाजारात जाऊ?' अशा प्रश्नांचा ओघ वाढला आहे. या अनिश्चिततेच्या काळात खालील पाच टिप्सचा विचार करा.3 / 10पाया पक्का करा : गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक साक्षरता महत्त्वाची आहे. मूलभूत गोष्टी न शिकता गुंतवणूक करणे म्हणजे श्वास घ्यायला न शिकता पाण्यात सूर मारण्यासारखे आहे.4 / 10इन्व्हेस्टमेंट स्टेटमेंट तयार करा : आपली कमाई, खर्च, गुंतवणूक, देणी आणि जोखीम घेण्याची क्षमता यांचा लेखी मसुदा तयार ठेवावा. स्वतः निर्णय घेण्याऐवजी एखाद्या विश्वासू आर्थिक सल्लागाराशी किंवा म्युच्युअल फंड वितरकाशी चर्चा करूनच पाऊल उचलावे.5 / 10घाईघाईत निर्णय नको : लगेच डायरेक्ट स्टॉक पोर्टफोलिओ बनवणे किंवा मोठ्या गुंतवणुकीचा निर्णय घेण्याची घाई करू नका. जोपर्यंत तुम्हाला पूर्ण माहिती मिळत नाही, तोपर्यंत वाट पाहणे कधीही श्रेयस्कर ठरते. अनेक मार्गही त्यावेळी निघत जातात.6 / 10चुकांतून शिका : जर तुम्ही अजून गुंतवणूक सुरू केली नसेल तर आजच करा. चुका झाल्या असतील तर घाबरू नका; शांत राहून त्यातून धडा घ्या आणि पुढे जा. 7 / 10इतरांसारखे करू नका : जर आपला शेजारी शेअरमध्ये गुंतवणूक करत असेल तर तुम्ही गुंतवणूक करून त्यात अडकू नका. त्यासाठी त्याचा जितका अभ्यास असेल तितका तुमचा असेलच असे नाही.8 / 10वर्ष २०२२- सोनं-५२६७० चांदी-५५१००, शेअर बाजार-५८३१० : वर्ष २०२३- सोनं-६५३३० चांदी-७८६००, शेअर बाजार-६०५५०9 / 10वर्ष २०२४- सोनं-७७९१३ चांदी-९५७००, शेअर बाजार-७१३८३ : वर्ष २०२५- सोनं-१,०५०० चांदी-२,६२,००० शेअर बाजार-७८६५७10 / 10वर्ष २०२६- सोनं-१६०९०० चांदी-२६८०००, शेअर बाजार-८३,६७५