'पंतप्रधान सूर्यादय योजना' काय आहे? घरचं वीज बिल शून्य रुपये येणार, योजनेचा लाभ असा घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 07:06 PM2024-01-31T19:06:46+5:302024-01-31T19:10:59+5:30

२२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'पंतप्रधान सूर्यादय योजनेची घोषणा केली. यानंतर या योजनेची जोरदार चर्चा सुरू झाली.

पंतप्रधान सूर्यादय योजनेच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनेल बसवू शकता. यामुळे तुमचे वीज बिल शून्य रुपयांवर येऊ शकते.

सोलर पॅनेलला एकदाच खर्च करुन बसवून घेतल्यानंतर तुम्हाला वीज बिलाच्या टेन्शनपासून मुक्ती मिळणार आहे. आता यासाठी केंद्र सरकारने एक योजनाही आणली आहे.या योजनेला 'पंतप्रधान सूर्यवंशी योजना' असं नाव देण्यात आले आहे.

या योजनेच्या माध्यमातून एक कोटी घरांवर सोलर पॅनेल बसवण्याचे लक्ष्य असल्याचे मोदींनी म्हटले आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला ४० टक्के सबसीडीवर सोलर पॅनेल बसवता येणार आहे.

या योजनेचा लाभ फक्त ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न २ लाख रुपयांपेक्षा कमी असेल त्यांनाच पंतप्रधान सूर्यादय योजनेचा लाभ घेता येणार आहे.

जर तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून सोलर पॅनेल जोडायचे असेल तर तुम्हाला आधी नॅशनल पोर्टल फॉर रुफटॉप सोलर'च्या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे.

या नोंदणीनंतर तुम्हाला रुफटॉप सोलर पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि लॉग इन करावे लागेल. या पुढे तुम्हाला रुफटॉपसाठी अर्ज करावा लागणार आहे.

यात तुम्हाला काही प्रश्न विचारले जाणार आहेत. यात योग्य माहिती भरावी लागणार आहे अन्यथा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.

तुम्ही तुमच्या घरावर जर सोलर पॅनेल बसवून घेतले तर तुम्हाला महावितरणच्या वीजेची गरज लागणार नाही. यामुळे तुम्हाला महिन्याला वीज बिल येणार नाही.

गेल्या काही दिवसापासून वीज बिलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या योजनेमुळे सर्वसामान्याना दिलासा मिळणार आहे.