शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

स्वत:च्या लग्नासाठी मुलगी शोधता-शोधता बनवली वेबसाईट; आज होतेय कोट्यवधींमध्ये कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 08:45 IST

1 / 7
मनात काहीतरी करण्याची जिद्द असेल तर मोठं यश नक्कीच मिळवता येतं. शादी डॉट कॉमचे (Shaadi.Com) संस्थापक आणि शार्क टँक इंडियाचे जज अनुपम मित्तल यांनी असंच काहीसं केलं आहे. आज त्यांच्यामुळे लाखो लोकांचे जीवन सुकर झालंय. अनुपम मित्तल हे त्यांच्या शादी डॉट कॉम या वेबसाइटच्या माध्यमातून लोकांसाठी एक आयुष्याचा जोडीदार शोधून देण्यासाठी काम करत आहेत.
2 / 7
जेव्हा अनुपम मित्तल (Anupam Mittal) आपल्या लग्नासाठी मुलगी शोधत होते, तेव्हा त्यांना ही वेबसाइट तयार करण्याची कल्पना सुचली. अनुपम यांच्या या कल्पनेमुळे ते कोट्यवधींच्या कंपनीचे मालक झाले. दरम्यान, Shaadi.com यशस्वी करणं अनुपम यांच्यासाठी इतकं सोपं नव्हतं. त्यांनी याद्वारे यशाचं शिखर कसं गाठलं हे आपण पाहूया.
3 / 7
अनुपम मित्तल यांचा जन्म २३ डिसेंबर १९७४ मध्ये मुंबईतील एका सामान्य कुटुंबात झाला. ते सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होते. त्यांना नेहमी काहीतरी नवीन करण्याची इच्छा होती. १९९४ मध्ये ते अमेरिकेत शिक्षणासाठी गेले. अनुपम मित्तल यांनी १९९८ मध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर वॉशिंग्टन डीसी येथील मायक्रोस्ट्रॅटेजी या बिझनेस इंटेलिजन्स सॉफ्टवेअर फर्ममध्ये प्रोडक्ट मॅनेजर म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
4 / 7
या कंपनीत त्यांनी चार वर्ष काम केलं. जेव्हा ते अमेरिकेतून परत आला तेव्हा त्यांच्या आईनं त्यांना लग्नासाठी अनेक मुलींचे फोटो दाखवले. अनुपम यांनी पाहिलं की अमेरिकेतील लोक भारतापेक्षा जास्त इंटरनेट वापरतात, त्यांना वाटलं की येत्या काही वर्षांत इंटरनेटच्या माध्यमातून भारतातही खूप नवीन गोष्टी घडू शकतात.
5 / 7
अनुपम लग्नासाठी तयार नव्हते. पण घरच्यांना टाकलेल्या दबावामुळे त्यांना एक कल्पना सुचली की सर्व मुला मुलींची माहिती एकत्र मिळू शकेल अशी वेबसाइट का तयार करू नये. लोक सहजपणे स्वतःसाठी एक चांगला आयुष्याचा जोडीदार शोधू शकतात. यानंतर त्यांनी Sagai.com नावाची पहिली वेबसाइट तयार केली आणि इंटरनेट मार्केटमध्ये हिट ठरली.
6 / 7
आजही जेव्हा जेव्हा लग्नासाठी मुलगा किंवा मुलगी शोधण्याचा प्रश्न येतो तेव्हा सर्वात पहिलं नाव समोर येतं ते म्हणजे Shaadi.com. ही साईट फक्त भारतातच नाही तर पाकिस्तान, बांगलादेश, कॅनडा, युएईमध्येही खूप प्रसिद्ध आहे. Shaadi.com वेबसाइटवर ३ दशलक्षाहून अधिक मॅचमेकिंग स्टोरीज रजिस्टर आहेत.
7 / 7
ही वेबसाइट भारतातील सर्वात मोठी आणि आशियातील आघाडीची मॅट्रिमोनियल वेबसाइट म्हणून ओळखली जाते. आज अनुपम मित्तल यांची एकूण संपत्ती १८५ कोटी रुपये आहे. आज ते Shaadi.com, makaan.com, mouj मोबाईल अॅपचे मालक आहेत. ते पीपल ग्रुपचेदेखील संस्थापक आहेत.
टॅग्स :businessव्यवसायInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी