शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

श्रीमंत व्हायचंय? मग मध्यमवर्गीयांनी 'या' ५ चुका टाळा! गुंतवणूक गुरु वॉरेन बफे यांचा मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 13:03 IST

1 / 6
याच वॉरेन बफे यांनी मध्यमवर्गीय कुटुंबांच्या अशा ५ मोठ्या चुका सांगितल्या आहेत, ज्या त्यांच्या आर्थिक प्रगतीच्या मार्गात अडथळा ठरतात. या चुकांमुळे मध्यमवर्गीय माणूस आयुष्यभर कष्ट करूनही संपत्ती निर्माण करू शकत नाही.
2 / 6
क्रेडिट कार्डचा 'सापळा' : बफे यांच्या मते, क्रेडिट कार्डचे १८ ते २४ टक्के व्याज हे आर्थिक आत्महत्येसारखे आहे. 'जगात असा कोणताही गुंतवणूकदार नाही जो १८ टक्क्यांहून अधिक शाश्वत परतावा देऊ शकेल. त्यामुळे कुठेही गुंतवणूक करण्यापूर्वी तुमचे क्रेडिट कार्डचे कर्ज शून्यावर आणा,' असा सल्ला बफे देतात. व्याजाच्या या चक्रातून बाहेर पडल्याशिवाय बचतीला अर्थ उरत नाही.
3 / 6
'स्टेटस'साठी नवीन कार खरेदी : मध्यमवर्गीय कुटुंब अनेकदा समाजाला दाखवण्यासाठी कर्ज काढून महागडी कार खरेदी करतात. बफे म्हणतात, 'कार हे केवळ प्रवासाचे साधन आहे, प्रतिष्ठेचे लक्षण नाही.' स्वतः अब्जाधीश असूनही बफे यांनी अनेक वर्षे जुनी कार वापरली. नवीन कार शोरूममधून बाहेर पडताच तिची किंमत घसरते, शिवाय कर्जाच्या हप्त्यांमुळे तुमची मोठी रक्कम वाया जाते, जी तुम्ही चांगल्या ठिकाणी गुंतवू शकला असता.
4 / 6
नशिबाचे खेळ : कमी श्रमात जास्त पैसे कमवण्याच्या नादात मध्यमवर्गीय माणूस लॉटरी किंवा जुगाराकडे वळतो. बफे यांच्या मते, हे पैशांचे नुकसान करणारे खेळ आहेत. 'लॉटरीवर पैसे खर्च करण्यापेक्षा एखाद्या चांगल्या व्यवसायात किंवा शेअर्समध्ये छोटी गुंतवणूक करा, जी काळानुसार वाढत जाईल,' असे ते सांगतात. नशिबापेक्षा 'कंपाउंडिंग'च्या ताकदीवर विश्वास ठेवणे हाच यशाचा मार्ग आहे.
5 / 6
गरजेपेक्षा मोठे घर : घर ही राहण्याची जागा आहे, संपत्ती प्रदर्शनाचे साधन नाही. वॉरेन बफे आजही १९५८ मध्ये घेतलेल्या छोट्या घरात राहतात. मध्यमवर्गीय लोक आयुष्यभराची कमाई आणि मोठे कर्ज घेऊन अवाढव्य घर बांधतात. यामुळे त्यांच्याकडे भविष्यासाठी भांडवल उरत नाही. घराचा आकार तुमच्या गरजेनुसार असावा, 'ईगो'नुसार नाही, असे बफे स्पष्ट करतात.
6 / 6
झटपट श्रीमंत होण्याची घाई : 'गुंतवणुकीला वेळ द्यावा लागतो,' हा बफे यांचा मूळ मंत्र आहे. मध्यमवर्गीय माणूस लवकर पैसे कमवण्याच्या नादात चुकीचे निर्णय घेतो. बफे यांचा सोपा नियम लक्षात ठेवा.
टॅग्स :Investmentगुंतवणूकshare marketशेअर बाजारStock Marketस्टॉक मार्केटMONEYपैसा