शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी 'गोल्डन' टीप; ५० लाखांच्या लोनवर अशी करा लाखोंची बचत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 11:48 IST

1 / 8
होम लोनच्या ईएमआयमध्ये सुरुवातीच्या ८ ते १० वर्षांत व्याजाचा हिस्सा सर्वात मोठा असतो. तुम्ही भरलेल्या पैशांपैकी फारच कमी रक्कम मूळ कर्जातून वजा होते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात केलेली छोटी बचतही मोठी ठरते.
2 / 8
जर तुम्ही दरवर्षी तुमच्या हप्त्याव्यतिरिक्त फक्त एक जादा ईएमआय भरला, तर तुमच्या कर्जाचा कालावधी आणि व्याज या दोन्हीमध्ये मोठी घट होते. यासाठी दरमहा पैसे वाचवण्याची गरज नाही, वर्षातून एकदा बोनस किंवा बचतीतून हे शक्य आहे.
3 / 8
समजा तुम्ही ५० लाख रुपयांचे कर्ज ८.५% व्याजाने २५ वर्षांसाठी घेतले आहे. तुमचा दरमहा ईएमआय साधारण ४०,२६१ रुपये येतो. २५ वर्षांत तुम्ही ७०.७८ लाख रुपये फक्त व्याज म्हणून बँकेला देता.
4 / 8
जर तुम्ही कर्जाच्या दुसऱ्या वर्षापासून दरवर्षी एक जादा ईएमआय (४०,२६१ रु.) भरण्यास सुरुवात केली, तर तुम्ही व्याजापोटी जाणारे सुमारे १८.३० लाख रुपये वाचवू शकता.
5 / 8
या एका अतिरिक्त हप्त्यामुळे तुमचे २५ वर्षांचे कर्ज साधारण १९.५ वर्षांतच संपते. म्हणजेच तुम्ही साडेपाच वर्षे आधीच कर्जमुक्त होऊ शकता.
6 / 8
जेव्हा तुम्ही अतिरिक्त पेमेंट करता, तेव्हा ती रक्कम थेट तुमच्या 'मूळ रकमेतून' वजा केली जाते. यामुळे पुढच्या महिन्यापासून व्याजाचे कॅल्क्युलेशन कमी रकमेवर होते, ज्याचा मोठा फायदा दीर्घकाळात मिळतो.
7 / 8
जसजसे तुमचे पगार किंवा उत्पन्न वाढते, तसतसे दरवर्षी ईएमआयची रक्कम ५-१०% वाढवल्यास तुम्ही तुमचे कर्ज अवघ्या १०-१२ वर्षांतही संपवू शकता.
8 / 8
होम लोनमध्ये प्रीपेमेंटचा सर्वात जास्त फायदा कर्जाच्या सुरुवातीच्या ५ ते १० वर्षांत होतो. जितक्या लवकर तुम्ही अतिरिक्त पैसे भरायला सुरुवात कराल, तितकी व्याजाची बचत जास्त होईल.
टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रHomeसुंदर गृहनियोजनReal Estateबांधकाम उद्योगbankबँक