शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

महागडे होऊ शकतात व्होडाफोन आयडियाचे रिचार्ज प्लॅन्स; पाहा काय आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 5:02 PM

1 / 10
व्होडाफोन आयडिया ही कंपनी आता संपूर्ण देशात 5G रेडी उपकरणं लावण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, व्होडाफोन आयडियाचे मॅनेजिंग एडिटर आणि सीईओ रविंदर ठक्कर यांनी व्होडाफोन-आयडियाचं नेटवर्क 5G रेडी असल्याचं म्हटलं.
2 / 10
एकीकडे सर्व कंपन्या 5G रेडी नेटवर्क तयार करत आहेत. तर दुसरीकडे काही जाणकारांनी पुढील काळात टॅरिफ प्लॅन महाग होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
3 / 10
परंतु हे टॅरिफ प्लॅन कितीनं वाढतील याची मात्र अद्यापही माहिती देण्यात आली नाही. तसंच या रेसमध्ये व्होडाफोन आयडिया ही कंपनी पुढे राहू शकते असंही सांगण्यात आलंय.
4 / 10
प्रत्येक तिमाहीत कंपन्यांच्या एव्हरेज रेव्हेन्यू पर युझरमध्ये सुधारणा होत आहे.३१ डिसेंबर २०२० पर्यंत व्होडाफोन आयडियाचा ARPU २ रूपयांनी वाढून तो ११९ रूपयांवरून १२१ रूपयांवर गेला आहे.
5 / 10
व्होडाफोन आयडिया यावेळी सर्वप्रथम टॅरिफ प्लॅन महाग करू शकते असं म्हटलं जातं आहे. २०१९ मध्येही टॅरिफचे दर वाढवणारी ही पहिली कंपनी होती.
6 / 10
सध्या व्होडाफोन आयडियाला टॅरिफ वाढवण्याची आवश्यकता आहे. आर्थिक वर्ष २०२१ च्या तिसऱ्या तिमाहीदरम्यान, कंपनीच्या महसूलात १ टक्क्याची वाढ झाली.
7 / 10
त्यानंतर कंपनीचा महसूल १०८.९ अब्ज रुपये इतका गेला. दरम्यान, टॅरिफ वाढल्यास कंपनीचा ARPU देखील वाढेल.
8 / 10
भारतात 5G सेवा आता सुरूवातीच्या टप्प्यात आहेत. परंतु कंपनी 5G रोलआऊट करण्यासाठी तयार असल्याचं व्होडाफोन आयडियाचं म्हणणं आहे.
9 / 10
तीन वर्षांच्या कठिण काळातून गेल्यानंतर व्होडाफोन आयडियासाठी मागील तिमाही चांगली ठरली.
10 / 10
दरम्यान, व्होडाफोन आयडिया आपलं संपूर्ण 3G नेटवर्क रोल आऊट करणार असून २०२२ पर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याचं रविंदर ठक्कर यांनी टेलिकॉम टॉकशी बोलताना सांगितलं.
टॅग्स :Vodafoneव्होडाफोनIdeaआयडियाInternetइंटरनेट