शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ग्राहकांची धमाल! दररोज मिळणार अतिरिक्त 1GB डेटा; मिळणार 6 तास फ्री अनलिमिटेड डेटा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 1:49 PM

1 / 6
Vodafone-Idea (Vi) ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. आता या ग्राहकांना इंटरनेट वापरण्यासाठी दररोज 1 GB अधिक डेटा मिळणार आहे. कंपनीनं आपल्या विद्यमान ग्राहकांसाठी आणि नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या दोन लोकप्रिय प्रीपेड प्लॅन्समध्ये मोठे बदल केले आहेत.
2 / 6
हे प्लॅन 409 आणि 475 रुपयांचे आहेत. 91 मोबाईलच्या रिपोर्टनुसार, या दोन्ही प्लॅनमध्ये आता यूजर्सना दररोज 1 GB अतिरिक्त डेटा मिळेल आणि त्यासाठी कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही. विशेष बाब म्हणजे या प्लॅनमध्ये कंपनी आधीच दररोज 6 तासांसाठी अनलिमिटेड डेटा मोफत देत आहे.
3 / 6
कंपनीचा हा प्लान 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये कंपनी इंटरनेट वापरासाठी दररोज 3.5 जीबी डेटा देत आहे. कंपनीचा हा प्लॅन देशभरातील सर्व नेटवर्कवर दररोज 100 मोफत एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंग ऑफर करतो. व्होडाफोन आयडियाचा हा प्लॅन अनेक अॅडिशनल बेनिफिट्ससह येतो.
4 / 6
यामध्ये कंपनी आपल्या ग्राहकांना बिंज ऑल नाईट बेनिफिटही ऑफर करत आहे. यामध्ये रात्री १२ ते सकाळी ६ या कालावधीत अनलिमिटेड इंटरनेटचा वापर करता येतो. या प्लॅनमध्ये विकेंड डेटा रोलओव्हर आणि 2 जीबीपर्यंत डेटा डिलाईट्सदेखील ऑफर केला जात आहे. तसंच कंपनी ग्राहकांना Vi movies and TV चंही मोफत अॅक्सेस देते.
5 / 6
475 रूपयांच्या प्लॅनमध्ये कंपनी 28 दिवसांच्या वैधतेसह दररोज 4GB डेटा देत आहे. प्लॅनमध्ये, तुम्हाला दररोज 100 मोफत एसएमएससह अमर्यादित कॉलिंग देखील मिळेल. 409 रुपयांच्या प्लॅन प्रमाणे, तुम्हाला रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत बिंज ऑल नाईट बेनिफिट देखील मिळेल.
6 / 6
कंपनी प्लॅनमध्ये वीकेंड डेटा रोलओव्हर आणि डेटा डिलाइट्स फायदे देखील देत आहे. Data Delights मध्ये, ग्राहकांना दर महिन्याला 2 GB पर्यंत बॅकअप डेटा मिळतो आणि यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. या प्लॅनचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कंपनी यामध्ये Vi Movies आणि TV चे फ्री सब्सक्रिप्शन देखील देत आहे.
टॅग्स :Vodafoneव्होडाफोनIdeaआयडिया