शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Vodafone-Idea (Vi) चा 'हा' प्लॅन ठरतोय बेस्ट; बेनिफिट्सच्या बाबतीत Reliance Jio ला टाकलं मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 4:05 PM

1 / 8
सध्या Reliance Jio, Airtel, Vodafone Idea या कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे बांधून ठेवण्याचे प्रयत्न करत आहेत. तर कंपनी नवनव्या ऑफर्ससह अनेक ग्राहकांना आकर्षित करण्याचेही प्रयत्न करत आहे. दरम्यान. व्हो़डाफोन आयडियाचा एक प्लॅन ग्राहकांसाठी उत्तम ठरताना दिसत आहे.
2 / 8
व्होडाफोन आयडिया ही कंपनी आपल्या ग्राहकांना जिओप्रमाणेच 249 रूपयांचा प्लॅन ऑफर करत आहे. या प्लॅनची वैधताही सारखीच आहे. याशिवाय कंपनी ग्राहकांना डेटा बेनिफिट आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही देत आहे.
3 / 8
परंतु या प्लॅनमध्ये कंपनी ग्राहकांना काही अॅडशनल बेनिफिट्सही देत आहे. त्यामुळेच हा प्लॅन ग्राहकांचा आवडता प्लॅन ठरतो. म्हणूनच हा प्लॅन जिओच्या प्लॅनपेक्षा उत्तमही ठरत आहे.
4 / 8
व्होडाफोन आयडियाच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 28 दिवसांची वैधता मिळते. तसंच कंपनी ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डेटाही देत आहे. यासह ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसही ऑफर केले जात आहे. यासोबतच रंपनी ग्राहतांना बिंज ऑल नाईट आणि वीकेंड डेटा रोलओव्हर सारखी सुविधाही देत आहे.
5 / 8
बिंज ऑल नाईट बेनिफिटमध्ये, कंपनी रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत अनलिमिटेड डेटा ऑफर करत आहे. त्याच वेळी, वीकेंड डेटा रोलओव्हरमध्ये, आपण आठवड्याच्या शेवटी उर्वरित दैनिक डेटा खर्च करू शकता.
6 / 8
प्लॅनचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे यासोबत कंपनी 20 रुपयांचे डिस्काउंट कूपन देखील देत आहे. हे डिस्काउंट कूपन युझर्सना पुढील रिचार्जवर रिडिम करता येऊ शकते. या प्लॅनसोबत मिळणारे अतिरिक्त फायदे म्हणजे कंपनी यामध्ये Vi Movies & TV Classic चं सबस्क्रिप्शनही देत आहे.
7 / 8
जिओच्या या प्लानमध्ये तुम्हाला दररोज 2 जीबी डेटा देण्यात येतो. 28 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएसचा लाभ देखील मिळेल.
8 / 8
कंपनी या योजनेत जिओ अॅप्सचा मोफत अॅक्सेसदेखील देत आहे. जिओच्या या प्लॅनमध्ये 20 टक्के कॅशबॅकचा लाभदेखील देण्यात येत आहे. जिओ मार्टवरून खरेदी करताना युझर्सना हा कॅशबॅक वापरता येऊ शकतो.
टॅग्स :Vodafoneव्होडाफोनIdeaआयडियाAirtelएअरटेलReliance Jioरिलायन्स जिओ