शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Petrol-Diesel Price VAT Reduced : यूपीत पेट्रोल थेट १२ रुपयांनी स्वस्त; 'व्हॅट' कमी करून ठाकरे सरकारही करणार का 'दिवाळी धमाका'?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2021 1:05 PM

1 / 9
बुधवारी केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ९ एनडीएशासित राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील व्हँट कमी करत दरात १७ रूपयांपर्यंत कपात करण्यात आली. दरम्यान, आता महाराष्ट्रातही ठाकरे सरकार पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करत नागरिकांना दिलासा देणार का हे पाहावं लागणार आहे.
2 / 9
दिवाळीपूर्वीच केंद्र सरकारनं पेट्रोलवर ५ रूपये आणि डिझेलवर १० प्रति लिटर उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर एनडीएशासित राज्यात व्हॅटवर ७ रूपयांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या राज्यांना दिवाळीचं डबल गिफ्ट मिळालं आहे.
3 / 9
बुधवारी केंद्र सरकारनं उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर राज्यांनाही व्हॅटमध्ये कपात करून नागरिकांना दिलासा देण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर आतापर्यंत काही राज्यांनी व्हॅटमध्ये कपात करत जनतेला दुहेरी दिवाळी गिफ्ट दिलं आहे. यामध्ये बहुतांश एनडीएशासित राज्यांचा समावेश आहे.
4 / 9
आतापर्यंत उत्तर प्रदेश, गुजरात, बिहार, गोवा, कर्नाटक, उत्तराखंड, आसाम, मणिपूर, त्रिपुरा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांनी व्हॅटमगद्ये कपात करत नागरिकांना दिलासा दिला आहे. उत्तर प्रदेशात पेट्रोललक ७ रूपये प्रति लिटर आणि डिझेलवर २ रुपये प्रति लिटर व्हॅट कमी करण्यात आला आहे. याप्रकारे आता उत्तर प्रदेशात पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी १२ रूपयांनी स्वस्त झालं आहे.
5 / 9
गुजरात, गोवा, कर्नाटक, आसाम, मणिपूर, त्रिपुरा आणि सिक्कीमनं पेट्रोल आणि डिझेलवर ७ रूपये प्रति लिटर व्हॅट कमी करण्याची घोषणा केली आहे. या राज्यांमध्ये आता पेट्रोल १२ रूपये आणि डिझेल १७ रूपये स्वस्त झालं आहे.
6 / 9
तर दुसरीकडे बिहार सरकरानं पेट्रोलवर १.३० रूपये आणि डिझेलवर १.९० रूपये व्हॅट कमी केला आहे. बिहारच्या जनतेला आता पेट्रोल ६.३० रूपये आणि डिझेल ११.९० रूपये स्वस्त मिळणार आहे. उत्तराखंड सरकारनं केवळ पेट्रोलवरील व्हॅट २ रूपयांनी कमी केला असून पेट्रोल या ठिकाणी ७ रूपये स्वस्त मिळेल.
7 / 9
केंद्रानं उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई या प्रमुख शहरांपैकी मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वाधिक आहेत. मुंबईत पेट्रोल १०९.९८ रूपये, तर डिझेल ९४.१४ रूपये इतकं झालं आहे.
8 / 9
तर दुसरीकडे दिल्लीत पेट्रोल १०३.९७ रूपये आणि डिझेल ८६.६७ रूपये, कोलकात्यात पेट्रोल १०४.६७ रूपये आणि डिझेल ८९.७९ रूपये आणि चेन्नईत पेट्रोल १०१. ४० रूपये आणि डिझेल ९१.४३ रूपये प्रति लिटर झालं आहे.
9 / 9
दरम्यान प्रमुख शहरांपैकी पेट्रोल आणि डिझेलचे सर्वाधिक दर मुंबईत आहेत. त्यामुळे केंद्राच्या निर्णयानंतर आता ठाकरे सरकार राज्यातील जनतेला आणखी दिलासा केव्हा देईल असा प्रश्न विचारला जात आहे.
टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलMahavikas Aghadiमहाविकास आघाडी