शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Top 10 Employers In India : संरक्षण मंत्रालय, रेल्वे, टीसीएस कोणत्या कंपन्या देताहेत सर्वाधिक नोकऱ्या; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 13:25 IST

1 / 9
देशात किती रोजगार मिळतील किंवा उपलब्ध आहेत, यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप तुम्हाला माहितच असतील. परंतु देशात सर्वाधिक नोकऱ्या देणाऱ्या कंपन्या कोणत्या आहेत हे तुम्हाला माहितीये का. आपण आज देशात सर्वाधिक रोजगार देणाऱ्या टॉप १० कंपन्या कोणत्या हे जाणून घेऊ.
2 / 9
देशातील सर्वाधिक रोजगार हे भारतीय संरक्षण मंत्रालय देतं. तिन्ही सैन्यदलात मिळून या मंत्रालयाच्या वतीने जवळपास ३० लाख रोजगार उपलब्ध होतात. एकुणातच भारत सरकार हा फक्त भारतातलाच नव्हे, तर जगभरातला सर्वात अधिक नोकऱ्या देणारा एम्प्लॉयर आहे.
3 / 9
यानंतर दुसऱ्या क्रमांकावर येते ती म्हणजे भारतीय रेल्वे. भारतीय रेल्वेत जवळपास साडेबारा लाख कर्मचारी सेवा बजावत आहे. या अर्थानं रेल्वे ही दुसरी सर्वात मोठी एम्पलॉयर आहे.
4 / 9
यामध्ये तिसरा क्रमांक येतो तो म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएसचा. खाजगी कंपन्यांमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस हा सर्वात मोठा एम्प्लॉयर आहे. खाजगी क्षेत्रात आजही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातच सर्वाधिक रोजगार उपलब्ध आहेत.
5 / 9
टॉप १० एम्प्लॉयर्सच्या यादीत चौथ्या क्रमाकांवर पुन्हा भारत सरकारच्याच पोस्ट खात्याचा समावेश आहे. सध्या पोस्ट खात्यात ४.३० लाख लोक काम करतात.
6 / 9
यानंतर क्रमांक येतो तो म्हणजे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सचा. रिलायन्समध्ये सध्याच्या घडीला ३.८९ लाख कर्मचारी कार्यरत आहेत.
7 / 9
या यादीत सहाव्या क्रमांकावर देशातील दिग्गज आयटी कंपन्यांपैकी असलेली एक म्हणजे इन्फोसिस. नारायण मूर्ती यांच्या इन्फोसिसमध्ये सध्या ३.४३ लाख कर्मचारी कार्यरत आहेत.
8 / 9
सर्वाधिक रोजगार देणाऱ्या कंपन्यांच्या यादीत सातव्या क्रमांकावर अससेली कंपनी म्हणजे अॅक्सेन्चर. अॅक्सेन्चरमध्ये जवळपास ३ लाख कर्मचारी काम करत आहेत.
9 / 9
तर यादीत नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर अनुक्रमे कॉग्निझंट आणि कोल इंडियाचा नंबर येतो. कॉग्निझंटमध्ये सध्या २.५ लाख, तर कोल इंडियामध्ये २.३८ लाख कर्मचारी कार्यरत आहेत. (संदर्भ - फिनशॉट्स)
टॅग्स :jobनोकरीGovernmentसरकार