Titan Success Story : दुसऱ्या कंपनीच्या मागणीला बनवलं हत्यार, घड्याळ बनवणाऱ्या टायटननं असे मिळवलं वर्चस्व
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 11:44 IST
1 / 8Success Story Of Titan: तुम्ही कधी असं ऐकलंय की एखाद्या कंपनीच्या उत्पादनाला खूप मागणी असते आणि या मागणीचा फायदा घेऊन एखादी कंपनी पुढे जाते. ऐकायला थोडं विचित्र वाटतं, पण टाटा ग्रुपची टायटन स्टोरी काहीशी अशीच आहे. 2 / 8९० च्या दशकात घड्याळांच्या बाजारात अचानक तेजी आली. अनेक कंपन्या रिंगणात उतरल्या. एचएमटी त्यापैकीच एक. ही कंपनी त्यावेळी भारतात घड्याळांचा बादशहा होती. पण तीच गोष्ट त्याच्या विरोधातही गेली.3 / 8टायटननं एचएमटी घड्याळांच्या प्रचंड मागणीचा फायदा घेतल्याचं म्हटलं जातं. टायटनची स्थापना १९८४ मध्ये झाली. एचएमटीची घड्याळ्यांना प्रचंड प्रमाणात मागणी होती. मागणी इतकी जास्त होती की कंपनी घड्याळांचा पुरवठा करण्यात अपयशी ठरत होती. 4 / 8टायटननं या संधीचा फायदा घेत जबरदस्त दर्जाची घड्याळं बाजारात आणली. लोकांनी टायटनचं उत्पादनांना विकत घेतलं आणि त्यानंतर कंपनीने मागे वळून पाहिलं नाही.5 / 8टायटन ही भलेही टाटा समूहाची कंपनी मानली जाते परंतु ती एकट्या टाटांनी सुरू केलेली नाही. यासाठी टाटा इंडस्ट्रीजनं तामिळनाडू औद्योगिक विकास महामंडळाशी हातमिळवणी केली. कंपनीचा पाया १९८४ मध्ये रचला गेला आणि १९८६ मध्ये उत्पादन सुरू झालं.6 / 8१९८७ मध्ये टायटन ब्रँडचा जन्म झाला. झेर्क्सेस देसाई यांना टायटनचे जनक मानले जाते. ते कंपनीचे पहिले एमडी होते. अनेक वर्षे घड्याळाच्या बाजारपेठेवर राज्य केल्यानंतर, टायटननं दागिन्यांच्या बाजारात प्रवेश केला आणि तनिष्कची १९९६ मध्ये स्थापना झाली.7 / 8या ब्रँडचं नाव टाटा आणि तामिळनाडू औद्योगिक विकास महामंडळाच्या नावांनी मिळून तयार केलेलं आहे. कंपनीचा पहिला कारखाना १९८७ मध्ये तामिळनाडूतील होसूर येथे सुरू झाला. आज टाटाकडे टायटनमध्ये सुमारे २२ टक्के हिस्सा टाटांकडे आणि टीआयडीसीकडे २८ टक्के हिस्सा आहे.8 / 8दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचाही टायटनवर खूप विश्वास होता. त्यांच्या पोर्टफोलिओचा मोठा भाग टायटनच्या शेअर्समध्ये होता. टायटन आज जगातील सहाव्या क्रमांकाची घड्याळ उत्पादक कंपनी आहे. हे फास्ट्रॅक ब्रँडची स्पोर्ट्स घड्याळांचं देखील उत्पादन करते.