याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 18:40 IST
1 / 8शेअर बाजारातील कधी कोणता शेअर आपल्या गुंतवणूकदाराला 'छप्परफाड' परतावा देईल, हे सांगता येत नाही. असाच एक शेअर आता चर्चेचा विषय बनला आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना एका दिवसात तब्बल ८७०० टक्के एवढा बंपर परतावा दिला आहे. अर्थात, या शेअरने एकाच दिवसात १ लाख रुपयांचे ८८ लाख बनवले आहेत.2 / 8हा शेअर एक रेअर अर्थ मायनिंग कंपनी कॅली रिसोर्सेसचा (Kaili Resources) आहे. ही एक ऑस्ट्रेलियन कंपनी आहे आणि तिचा शेअर ऑस्ट्रेलियन शेअर बाजारात लिस्टेड आहे. सोमवारी हा शेअर ३.१८ ऑस्ट्रेलियन डॉलर्स (AUD) वर पोहोचला. 3 / 8यापूर्वी हा शेअर ०.३६० ऑस्ट्रेलियन डॉलर्सवर बंद झाला होता. अशा परिस्थितीत तो एका दिवसात ८७३३% अर्थात सुमारे ८८ पट वाढला आहे. या तेजीमुळे कंपनीच्या शेअर्सचे ट्रेडिंग थांबवावे लागले.4 / 8कॅली रिसोर्सेस ही एक छोटी कंपनी आहे. या कंपनीला आधी तोटा होत होता. मात्र सोमवारी हिचे शेअर्स अचानकच वधारले. यामुळे ही कंपनी अचानकच चर्चेत आली. या कंपनीच्या शेअरमध्ये आलेल्या या जबरदस्त तेजीमुळे, शेअर बाजाराला कंपनीच्या शेअर्सचे ट्रेडिंग थांबवावे लागले. कॅली रिसोर्सेस रेअर अर्थ मायनिंगचे काम करते.5 / 8महत्त्वाचे म्हणजे, दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये ड्रिलिंगला मंजुरी मिळाल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी आली आहे. आपल्याला दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये रेअर अर्थ धातूंसाठी ३ ठिकाणी ड्रिलिंगला मंजुरी मिळाल्याचे कंपनीने १५ ऑगस्ट रोजी सांगितले होते. येथे रेअर अर्थ घटकांचा शोध घेतला जाईल. यामुळे महत्त्वाच्या खनिजांमध्ये गुंतवणूकदारांचा रस वाढू शकतो.6 / 8 गुंतवणूकदारांना असं केलं मालामाल... - सोमवारी या शेअरची किंमत सर्वाधिक होती. गेल्या ५२ आठवड्यांतील ही सर्वाधिक किंमत ठरली. तर गेल्या ५२ आठवड्यांतील सर्वात कमी किंमत ०.००६० ऑस्ट्रेलियन डॉलर्स एवढी होती. सोमवारी हा शेअर ३.१८ ऑस्ट्रेलियन डॉलर्सवर पोहोचला. अशा पद्धतीने या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. 7 / 8बुधवारी पुन्हा सुरू होईल ट्रेडिंग - शेअरमध्ये आलेल्या या तेजीनंतर, त्याचे ट्रेडिंग थांबवण्यात आले होते. महत्त्वाचे म्हणजे कंपनीच्या विनंतीवरून या शेअरचे ट्रेडिंग थांबवण्यात आले. कंपनीने ऑस्ट्रेलियन सिक्युरिटीज एक्सचेंजला (ASX) लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, 'ट्रेडिंग तत्काळ थांबवन्यात यावी, अशी आम्ही विनंती करतो.' यानंतर, कंपनीच्या शेअरचे ट्रेडिंग थांबवण्यात आले. आता बुधवारी पुन्हा ट्रेडिंगला सुरुवात होईल.8 / 8(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)