१३ दागिन्यांची दुकाने, ६ रेस्टॉरंट्स आणि ४ सुपरमार्केटचा मालक, तरीही दररोज चालवतात टॅक्सी; का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 14:32 IST
1 / 8फिजीमधील एका ८६ वर्षीय वृद्ध टॅक्सी चालकाचा व्हिडिओ भारतीय उद्योजक नव शाह यांनी सोशल मीडियावर शेअर केला, ज्यामध्ये या चालकाच्या साध्या राहणीमानामागील मोठे सत्य समोर आले.2 / 8ही वृद्ध व्यक्ती कोणी सामान्य टॅक्सी चालक नसून तब्बल १७५ दशलक्ष डॉलर्स (सुमारे १५७५ कोटी रुपये) वार्षिक उलाढाल असलेल्या एका मोठ्या बिझनेस साम्राज्याचे मालक आहेत.3 / 8या ८६ वर्षीय व्यक्तीचे स्वतःचे १३ दागिन्यांचे शोरूम (ज्वेलरी स्टोअर्स), ६ रेस्टॉरंट्स, ४ सुपरमार्केट आणि एक स्थानिक वृत्तपत्र असा मोठा व्यवसाय आहे.4 / 8त्यांच्या वडिलांनी १९२९ मध्ये अवघ्या ५ पाउंडांपासून हा व्यवसाय सुरू केला होता, ज्याचा त्यांनी आज एका विशाल साम्राज्यात विस्तार केला आहे.5 / 8एवढी मोठी श्रीमंती असतानाही केवळ छंद म्हणून किंवा वेळ घालवण्यासाठी नव्हे, तर एका उदात्त हेतूने ते आजही उबर टॅक्सी चालवण्याचे काम करतात.6 / 8टॅक्सी चालवून मिळणाऱ्या सर्व उत्पन्नातून ते दरवर्षी भारतातील २४ मुलींच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलतात; त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी ते स्वतः कष्ट करतात.7 / 8त्यांना स्वतःला तीन मुली आहेत. आपल्या मुलींप्रमाणेच इतर गरजू मुलींनीही स्वतःची स्वप्ने पूर्ण करावीत, ही त्यांची त्यामागील भावना आहे.8 / 8श्रीमंतीचा डामडौल न मिरवता, केवळ समाजाचे देणे लागते या भावनेने काम करणाऱ्या या वृद्ध अरबपतीची गोष्ट आज जगभरातील लोकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.