Tesla च्या एन्ट्रीवर 'TAX' चा स्पीडब्रेकर; अमेरिकेत ३० लाख, भारतात कार ६० लाखांपर्यंत जाण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 11:42 IST
1 / 10अमेरिकेची प्रसिद्ध इलेक्ट्रीक वाहन कंपनी टेस्लाची (Tesla) कार विकत घेणाऱ्या श्रीमंतांसाठी एक वाईट बातमी आहे. 2 / 10भारत सरकार आणि टेस्लाच्या दरम्यान, आयात शुल्काच्या वादावरून कंपनी आपल्या कार्सचं लाँच टाळू शकतं. 3 / 10यापूर्वी, टेस्लाच्या एलन मस्कने भारत सरकारकडे इलेक्ट्रीक कारवरील आयात शुल्क कमी करण्याची मागणी केली होती. 4 / 10आता सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की इलेक्ट्रिक वाहनांवरील आयात शुल्क कमी करण्याची कोणतीही योजना नाही. 5 / 10अवजड उद्योग मंत्रालयात असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. सरकार याला चालना देण्यासाठी देशांतर्गत कर आणि चार्जिंग स्टेशन उभारण्यासारखी अन्य पावले उचलत आहे, असं केंद्रीय मंत्री कृष्ण पाल गुर्जर यांनी संसदेत सांगितलं.6 / 10ब्लूमबर्गनं दिलेल्या वृत्तानुसार टेस्लाने गेल्या महिन्यात परिवहन आणि उद्योग मंत्रालयाला पत्र लिहून त्यांना इलेक्ट्रिक कारवरील आयात शुल्क सध्याच्या १०० टक्क्यांच्या मर्यादेवरून ४० टक्क्यांवर आणण्याची विनंती केली होती.7 / 10भारतात आयात शुल्क जगात सर्वाधिक आहे. जर कंपनीला भारतात आयात केलेल्या वाहनांमुळे यश मिळालं, तर कंपनी उत्पादन कारखाना उभारण्याचा विचार करू शकते, असं एलन मस्क यांनी आपल्या ट्विटरवरून म्हटलं होतं. 8 / 10टेस्लाच्या भारतातील आयात शुल्काबाबतच्या निर्णयामुळे देशातील कार उत्पादकांमध्ये वादाला तोंड फुटले आहे.9 / 10देशाची आघाडीची कार कंपनी मारुती सुझुकी इंडिया (एमएसआय) चे अध्यक्ष आर सी भार्गव यांनी देखील अलीकडेच म्हटले आहे की, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) च्या उच्च दरामुळे आणि अधिग्रहणाच्या उच्च किंमतीमुळे देशातील कारची मागणी मंदावली आहे.10 / 10सध्या, भारत ४० हजार डॉलर्स पेक्षा अधिक मूल्याच्या पूर्णपणे आयात केलेल्या कारवर CIF सह (किंमत, विमा आणि मालवाहतूक) सह १०० टक्के आयात शुल्क आकारतो. यापेक्षा कमी किमतीच्या कारवर आयात शुल्क ६० टक्के आयात शुल्क आकारण्यात येतं.