'ताज'चे नाव आता 'जीव्हीके' हॉटेल्सवरून हटणार; टाटा समुहाने संपूर्ण हिस्सा विकला, कोण आहे खरेदीदार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 13:14 IST
1 / 7इंडियन हॉटेल्सने या जॉइंट व्हेंचरमधील आपली संपूर्ण २५.५२% भागीदारी विकली असून, ३० डिसेंबरला बाजार बंद झाल्यानंतर ही माहिती एक्सचेंजला देण्यात आली. या निर्णयामुळे आता 'जीव्हीके' समूहाच्या या हॉटेल्सच्या नावापुढून प्रतिष्ठित 'ताज' हा शब्द अधिकृतरीत्या हटवला जाणार आहे.2 / 7इंडियन हॉटेल्सने त्यांच्या ताब्यातील १.६ कोटी शेअर्स (२५.५२% हिस्सा) ३७० रुपये प्रति शेअर या किमतीने शालिनी भूपाल यांना विकले आहेत. या व्यवहाराची एकूण किंमत सुमारे ५९२ कोटी रुपये असल्याचे समजते. या विक्रीसह टाटा समूहाचा या कंपनीतील मालकी हक्क औपचारिकपणे संपला आहे.3 / 7टाटा समूहाने आपला हिस्सा विकल्यामुळे 'ताज जीव्हीके'ला आता त्यांचे कॉर्पोरेट नाव बदलावे लागणार आहे. कंपनीच्या नावातून 'ताज' हा शब्द काढून नवीन ब्रँड नेम स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सेवांवर याचा त्वरित परिणाम होणार नाही.4 / 7२००७ मध्ये झालेला 'नाव आणि ट्रेडमार्क लायसन्स' करार आणि २०११ मधील 'शेअरहोल्डर्स' करार आता रद्द करण्यात आले आहेत. 'इंडियन हॉटेल्स'ने नियुक्त केलेल्या सर्व संचालकांनी ३० डिसेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.5 / 7गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे, इंडियन हॉटेल्सने मालकी हक्क सोडला असला तरी, ते आधीच झालेल्या 'हॉटेल ऑपरेटिंग एग्रीमेंट' अंतर्गत या हॉटेल्सचे संचालन सुरू ठेवणार आहेत. म्हणजेच, जीव्हीके समूहाची ही हॉटेल्स आता टाटा समूहाच्या 'कॅपिटल-लाईट' (कमी भांडवल, जास्त व्यवस्थापन) मॉडेलवर चालतील.6 / 7या स्टेक सेल नंतर, जीव्हीके-भूपाल कुटुंब आता ७४.९९% हिश्शासह कंपनीचे मुख्य प्रमोटर म्हणून कायम राहील. हैद्राबादमधील प्रसिद्ध हॉटेल्स आणि बेंगळुरूमध्ये येणारा नवीन प्रकल्प यांचे व्यवस्थापन इंडियन हॉटेल्सच पाहणार आहे. 7 / 7हा निर्णय इंडियन हॉटेल्सच्या भविष्यातील 'कॅपिटल-लाईट' विस्तार धोरणाला पाठबळ देण्यासाठी घेण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.