पाहा Tata Safari ची पहिली झलक; पुणे प्लांटमध्ये उत्पादन सुरू

By जयदीप दाभोळकर | Published: January 14, 2021 06:07 PM2021-01-14T18:07:24+5:302021-01-14T18:15:33+5:30

टाटा मोटर्सनं गुरूवारी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून टाटा सफारीची पहिली झलक दाखवली. कंपनीनं टाटा सफारीची पहिली युनिट सादर करण्यासाठी पुण्यातील आपल्या प्लांटमध्ये एक फ्लॅग ऑफ सेरेमेनी आयोजित केली होती. (सर्व फोटो - टाटा मोटर्स)

टाटा सफारी ही कार जानेवारी महिन्यातच लाँच करण्यात येणार आहे. तसंच लवकरच या कारचं लवकरच बुकींग ही सुरू केलं जाणार आहे.

टाटा मोटर्सनं सफारीसाठी एक ऑगमेंटेड रिअॅलिटी एक्सपिरिअन्सही लाँच केला आहे. अनेक इंटरॅक्टिव्ह फीचर्सद्वारे ग्राहकांना टाटा सफारीबाबत अधिक माहिती घेता येणार आहे.

टाटा सफारी ही कार टाटा मोटर्सच्या इम्पॅक्ट २.० डिझाईन लँगवेजवर बेस्ड असणार आहे. याव्यतिरिक्त टाटा सफारीमध्ये कंपनी OMEGARC प्लॅटफॉर्मचा वापर करणार आहे.

या कारमध्ये ओयस्टर व्हाईट थीम असलेलं इंटिरिअर देण्यात आलं आहे. तसंच अॅशवूड डॅशबोर्डही देण्यात आला आहे.

याव्यतिरिक्त कारमध्ये फ्लोटिंग टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट असेल. तसंच त्याचा Apple CarPlay आणि Android Auto लादेखील सपोर्ट करेल.

New Tata Safari मध्ये स्टेप्ड रूफ असेल. ऑटो एक्स्पो २०२० मध्ये टाटा सफारीला ग्रॅव्हिटास या कोडनेमनं शोकेस करण्यात आलं होतं.

टाटा सफारीमध्ये 2.0 लिटर, ४ सिलिंडर इंजिन असण्याची शक्यता आहे. जे १७० बीएचपी पॉवर आणि ३५० एनएमचा टॉर्क जनरेट करते.

तसंच याव्यतिरिक्त या कारमध्ये ६ स्पीड मॅन्युअल आणि ६ स्पीड ऑटोमॅटिक गिअर बॉक्सही असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याव्यतिरिक्त सफारीमध्ये टर्बो पेट्रोल इंजिन आणि त्यासोबतच DCT गिअरबॉक्स असण्याचीही शक्यता आहे.

टाटा सफारी नव्या जनरेशनच्या Mahindra XUV500, 7 सीटर Hyundai Creta, MG Hector Plus, Toyota Innova Crysta यांना टक्कर देणार असल्याचं म्हटलं जात आहे.