1 / 12कोरोना संकटाचा प्रतिकूल प्रभाव ओसरतो, तोच रशिया आणि युक्रेनच्या युद्धाने जगाला पुन्हा एकदा धक्का दिला. एकूणच आंतरराष्ट्रीय पातळीवरील घटनांचे पडसाद भारतीय शेअर मार्केटमध्ये उमटताना दिसत आहेत. 2 / 12मात्र, काही कंपन्यांनी कोरोना काळातच दमदार कामगिरी करत गुंतवणूकदारांना सर्वोत्तम परतावा देताना मालामाल केले आहे. त्यातील एक मोठा ग्रुप म्हणजे TATA. TATA ग्रुप आताच्या घडीला अनेक क्षेत्रात दमदार कामगिरी करत आहे. 3 / 12शेअर मार्केटमध्येही टाटाच्या विविध कंपन्या रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे गुंतवणूकदार मालामाल होत आहेत. गुंतवणूकदारांचा टाटावरील विश्वास वाढत चालला आहे.4 / 12TATA ग्रुपच्या एका कंपनीच्या शेअरने दमदार कामगिरी करत गुंतवणूकदारांना प्रचंड परतावा दिला आहे. टाटा समूहातील या कंपनीचे नाव आहे टाटा एलेक्सी. (Tata Elxsi). या कंपनीने यशस्वी घोडदौड कायम ठेवल्याचे पाहायला मिळत आहे. 5 / 12Tata Elxsi च्या शेअर्सनी गेल्या काही वर्षांमध्ये गुंतवणूकदारांना जवळपास ५० हजार टक्के परतावा दिला आहे. या कालावधीत कंपनीचे शेअर्स १७ रुपयांवरून ८६०० रुपयांहून अधिक पातळीपर्यंत वाढले आहेत. या कंपनीने यावर्षी आतापर्यंत गुंतवणूकदारांना ४७ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.6 / 12Tata Elxsi कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ९,४२० रुपये आहे. २१ सप्टेंबर २००१ रोजी NSE वर Tata Elxsi चे शेअर्स १७ रुपयांच्या पातळीवर होते. ७ जून २०२२ रोजी कंपनीचे शेअर्स ८,६४० रुपयांवर आहेत.7 / 12जर एखाद्या व्यक्तीने २१ सप्टेंबर २००१ रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या हे पैसे ४.९५ कोटी रुपयांच्या जवळपास गेले असते.8 / 12Tata Elxsi च्या शेअर्सनी गेल्या ५ वर्षात गुंतवणूकदारांना १,०२७ टक्के परतावा दिला आहे. ९ जून २०१७ रोजी या कंपनीचे शेअर्स ७७० रुपयांच्या पातळीवर होते. जर एखाद्या व्यक्तीने ९ जून २०१७ रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि त्याची गुंतवणूक तशीच ठेवली असती, तर सध्याची रक्कम ११ लाखांपेक्षा जास्त झाली असती.9 / 12Tata Elxsi ही वाहतूक, माध्यम, दळणवळण आणि आरोग्यनिगा तसेच वैद्यकीय उपकरणे यांसारख्या विविध क्षेत्रात आरेखन नेतृत्वाखालील तंत्रज्ञान सेवांमध्ये गुंतलेली आघाडीची तंत्रज्ञान कंपनी आहे.10 / 12या कंपनीने अलीकडेच तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. वार्षिक आधारावर, Tata Elxsi चा महसूल ३१.५ टक्क्यांनी वाढून ६८१.७ कोटी रुपये झाला आहे. कंपनीचे ऑपरेटिंग मार्जिन ३२.५ टक्के राहिले. 11 / 12Tata Elxsi कंपनीचा सर्वांत मोठा विभाग, एम्बेडेड प्रॉडक्ट डिझाइन तिमाही आधारावर ७.५ टक्क्यांनी वाढला. औद्योगिक डिझाइन आणि व्हिज्युअलायझेशन विभाग मागील तिमाहीच्या तुलनेत ८ टक्क्यांनी वाढला आहे. 12 / 12शेअर मार्केटमधील गुंतवणूक जितकी दीर्घकालीन, तितकेच तिचे लाभ अधिक होतात, असे सांगितले जाते. शेअर मार्केटमधील गुंतवणूक संयमाने तसेच विचारपूर्वक करावी, असा सल्ला दिला जातो. TATA च्या या कंपनीमुळे गुंतवणूकदार पुन्हा एकदा मालामाल झाले आहेत. तुम्ही घेतलेत का या कंपनीचे शेअर्स?