शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

TATA Group IPO : खिशात पैसे तयार ठेवा, टाटा समूहाचे येतायत दोन IPO; कमाईची मिळणार संधी, सेबीचीही मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2023 3:48 PM

1 / 7
तुम्हाला जर कमाईची मोठी संधी चुकवायची नसेल, तर तुमच्या खिशातील पैसे साठवून ठेवा. कारण लवकरच देशातील सर्वात मोठ्या समूह टाटाचे एक नव्हे तर दोन IPO येणार आहेत.
2 / 7
१८ वर्षांनंतर टाटा समूहाच्या कंपन्या शेअर बाजारात लिस्टींगसाठी येत आहेत. टाटा प्लेच्या प्रस्तावित आयपीओला सेबीने ग्रीन सिग्नल दिला आहे. कंपनीनं दाखल केलेल्या कागदपत्रांवर सेबीने २६ एप्रिल रोजी एक ऑब्झर्व्हेशन लेटर जारी केले होते. टाटा प्ले जवळपास दोन दशकांमध्‍ये IPO आणणारी समूहाची पहिली कंपनी बनू शकते.
3 / 7
बिझनेस स्टँडर्डच्या अहवालात सूत्रांच्या हवाल्यानं असं म्हटलं आहे की टाटा सन्स आणि वॉल्ट डिस्ने कंपनी यांच्यातील संयुक्त उपक्रम, टाटा प्ले, आयपीओमधून सुमारे ३ हजार कोटी रुपये उभारण्याचा विचार करत आहे. दुसरीकडे, टाटा टेक्नॉलॉजीज देखील आपला आयपीओ आणत आहे.
4 / 7
कंपनीनं मार्चमध्ये DRHP दाखल केला होता. कंपनी सेबीच्या मंजुरीची वाट पाहत आहे. टाटा समूह या आयपीओद्वारे ४ हजार कोटी जमा करण्याचा प्रयत्न करणार आहे.
5 / 7
ऑब्झर्व्हेश लेटर जारी केल्यानंतर, टाटा प्लेला आता IPO लाँच करण्यापूर्वी अपडेटेड ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (UDRHP-1) दाखल करावा लागेल. DRHP मध्ये सेबीनं जारी केलेली निरीक्षणे समाविष्ट करावी लागतील आणि ती लोकांसाठी उपलब्ध करून दिली जातील.
6 / 7
तथाकथित गोपनीय फायलिंग अथवा प्री फायलिंग रुट इंतर्गत एका अनलिस्टेड कंपनीला आपले प्सत्वाव दस्तऐवजाला आपली योजना पूर्ण करत नाही तोवर खासगी ठेवण्याची परवानगी आहे.
7 / 7
नियमांनुसार कंपनीला रेग्युलेटरी अप्रुव्हलच्या १६ महिन्यांनंतर अपडेटेड डीआरएचपी फाईल करावी लागेल, ज्याची वैधता १८ महिन्यांची आहे. डायरेक्ट टू होम प्लॅटफॉर्मनं २९ नोव्हेंबर रोजी गोपनीय रित्या आपले डीआरएचपी प्री-फाईल केलं होतं.
टॅग्स :TataटाटाIPOइनिशिअल पब्लिक ऑफरिंग