1 / 7टाटा समूहाच्या टायटन कंपनीने केलेल्या एका घोषणेने दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांची लॉटरी लागली आहे. टायटनच्या या घोषणेमुळे झुनझुनवाला यांच्या संपत्तीत तब्बल 34 कोटी रुपयांची वाढ होणार आहे.2 / 7टायटन कंपनीचा नफा मार्च 2022 च्या तिमाहीत 7 टक्क्यांनी घटला आहे. असे असतानाही कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 7.50 रुपये लाभांश देण्याची घोषणा केली आहे.3 / 7टायटन कंपनीत राकेश झुनझुनवाला यांचा मोठा वाटा आहे. तसेच, प्रति शेअर 7.5 रुपयांच्या लाभांशासह, बिग बुल राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांची संपत्ती जवळपास 34 कोटी रुपयांनी वाढण्याचा अंदाज आहे.4 / 7टायटनमध्ये झुनझुनवालांची गुंतवणूक किती? - टायटन कंपनीच्या जानेवारी-मार्च 2022 च्या शेअरहोल्डिंगनुसार, दिग्गज इनव्हेस्टर राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनीचे तब्बल 3,53,10,395 शेअर्स अथवा जवळपास 3.98 टक्के हिस्सेदारी आहे. तर त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे 95,40,575 शेअर्स अथवा जवळपास 1.07 टक्के हिस्सेदारी आहे. 5 / 7टायटन कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांतील लो-लेव्हल 1404 रुपये आहे. तर, तर कंपनीच्या शेअरचे 52 आठवड्यांतील हाय लेव्हल 2,767.55 रुपये आहे.6 / 7लाभांश स्वरुपात टायटनपासून होणारी कमाई - राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनीचे 3,53,10,395 शेअर्स आहेत. ज्वैलरी कंपनीने प्रति शेअर 7.50 रुपये एवढा लाभांश देण्याची घोषणा केली आहे. अशात बिगबूल यांच्या संपत्तीत जवळपास 26.50 कोटी रुपयांची वाढ होण्याचा अंदाज आहे. 7 / 7याच बरोबर राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे 95,40,575 शेअर्स आहेत. अशात त्यांच्या संपत्तीतही जवळपास 7.15 कोटी रुपयांची वाढ होईल. अशा पद्धतीने लाभांश स्वरुपात होणारी या दोघांची संयुक्त कमाई जवळपास 34 कोटी रुपये असेल. टायटन कंपनीचा शेअर गुरुवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये 2279 रुपयांवर ट्रेड करत होता.