शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गोल्ड लोन घेताना राहा सावध; 'या' गोष्टींकडे नक्की द्या लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 1:11 PM

1 / 20
सोने पारंपारिकपणे ग्राहकांची पसंती आहे. आजही कर्जाचे बरेच पर्याय असूनही सोन्यावर कर्ज सहज आणि जलदगतीनं उपलब्ध आहे.
2 / 20
तथापि, कोरोना संकटाचा परिणाम सोन्यावरील कर्जाच्या व्यवसायावरही झाला आहे. संकट अधिक तीव्र होत असताना सोनं ५५ हजार रूपयांच्या पातळीवर पोहोचलं होते.
3 / 20
तर लसीचं उत्पादन सुरू झाल्यानंतर त्याच्या किंमतीत घसरण होऊन ती ४३ हजार रूपये प्रति १० ग्राम पर्यंत आली होती.
4 / 20
किंमतीतील चढउतारांमुळे सोन्यावरील कर्ज घेणाऱ्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. सोनं तारण ठेवून कर्ज घेताना काय लक्षात ठेवलं पाहिजे ते सर्वप्रथम पाहिलं पाहिजे.
5 / 20
इतर कोणत्याही प्रकारच्या कर्जाच्या तुलनेत सोनं तारण ठेवून कर्ज सर्वात सहज आणि कमी वेळात मिळतं.
6 / 20
बिगर-बँकिंग फायनान्स कंपन्या सोनं तारण ठेवून दिल्या जाणाऱ्या कर्जासाठी केवळ पाच मिनिटांत पैसे देण्याचा दावा करतात. तथापि, हे केवळ काही प्रकरणांमध्येच दिसून येतं.
7 / 20
बहुतांश प्रकणांमध्ये सोन्यावरील कर्ज एक ते दोन तासांत उपलब्ध होतं. त्यास अधिक कागदपत्रांची आवश्यकता देखील नाही.
8 / 20
याशिवाय सोन्यावरील कर्जाच्या बदल्यात केवळ व्याज द्यावे लागेल. तर दुसरीकडे इतर कर्जाइंतकी त्याची ईएमआयची रक्कमही नसते.
9 / 20
रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्या सोन्याच्या किंमतीच्या ७५ टक्क्यांपर्यंत कर्ज देऊ शकतात. त्याच वेळी बँका ९० टक्क्यांपर्यंत कर्ज देऊ शकतात.
10 / 20
दरम्यान, काही जाणकारांच्या मते एनबीएफसी आणि बँक सामान्य स्थितीत ७५ टक्क्यांपर्यंतच रक्कम देणं पसंत करतात.
11 / 20
काही प्रकरणांमध्ये बँका ग्राहकांशी जुने संबंध आणि त्याच्या खात्यांच्या स्थितीनुसार जास्तीत जास्त पैसे देण्याचा पर्यायदेखील देतात. सोन्यावरील कर्जाचे व्याजदर हे ७ ते २७ टक्क्यांपर्यंत आहेत.
12 / 20
सध्या बहुतेक एनबीएफसी आणि बँका एका वर्षासाठी सोन्यावरील कर्जाची ऑफर देत आहेत. तथापि, ग्राहक ते पुढे देखील वाढवू शकतात.
13 / 20
बँका ग्राहकांचा पेमेंट रेकॉर्ड पाहून कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की पहिल्यांदा दोन वर्षांच्या कालावधीसाठी सोन्यावर कर्जे दिली जात होती.
14 / 20
परंतु कोरोनामुळे ते आता त्याचा कालावधी एक वर्ष करण्यात आला आहे. असं असूनही ग्राहकांकडे मुदत वाढविण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
15 / 20
पर्सनल लोनमध्ये केवळ प्रोसेसिंग शुल्क आकारले जाते. बँका आणि एनबीएफसीकडून सोन्यावरील कर्ज घेण्यासाठी अनेक प्रकारचं शुल्क घेतलं जातं.
16 / 20
यात प्रोसेसिंग शुल्क, मुद्रांक शुल्क आणि मूल्यांकन शुल्क यांचा समावेश आहे. काही एनबीएफसी आणि बँका प्रीपेमेंट फी देखील आकारतात.
17 / 20
जर तुम्हाला दहा लाख रुपयांचे सोन्यावरील कर्ज मिळू शकते, तर आपण सात किंवा आठ लाख रुपयांचे कर्ज घ्यावं.
18 / 20
तज्ज्ञांचे म्हणण्यानुसार जेव्हा सोन्याची किंमत कमी होते, तेव्हा बँका कर्जाच्या कालावधीच्या मध्यात ही रक्कम परत करण्यास सांगतात.
19 / 20
तुमच्या सोन्याचे मूल्य १० लाख रुपये आहे आणि ७५ टक्क्यांच्या हिशोबानं तुम्ही एका वर्षासाठी ७.५० लाख रुपयांचं कर्ज घेतलं. सहा महिन्यांनंतर जर किंमत २० टक्के कमी झाली, तर सोन्याचे मूल्य आठ लाख रुपये आणि कर्जाची रक्कम सहा लाख रुपये होईल.
20 / 20
अशा परिस्थितीत बँका तुम्हाला दीड लाख रुपये त्वरित देण्यास सांगू शकतात, असं जाणकारांचं म्हणणं आहे.
टॅग्स :GoldसोनंMONEYपैसाbankबँक