शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 18:28 IST

1 / 9
कोलाब प्लॅटफॉर्म्सचा शेअर (Colab Platforms share price) सध्या सातत्याने फोकसमध्ये आहे. कंपनीच्या शेअरला आज सोमवारी 39व्या दिवशी अप्पर सर्किट लगले. या शेअरला आज 2 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले आणि तो ₹63.96 वर पोहोचला.
2 / 9
हा स्मॉल-कॅप शेअर सातत्याने 39 सत्रांपासून अप्पर सर्किटला स्पर्श करत आहे. या स्मॉल-कॅप शेअरने गेल्या सहा महिन्यांत 148 टक्क्यांहूनही अधिकचा, तर एका वर्षात 800 टक्क्यांच्या मल्टीबॅगर परतावा दिला आहे.
3 / 9
जून तिमाहीचे निकाल - स्मॉल-कॅप स्टॉक कोलाब प्लॅटफॉर्म्सने 4 ऑगस्टला घोषणा केली आहे की, बोर्ड बुधवारी, 13 ऑगस्टला बैठक करेल. या बैठकीत 30 जून, 2025 रोजी संपणाऱ्या कालावधीसाठीच्या आर्थिक परिणामांवर विचार केला जाईल आणि त्यांना मान्यता दिली जाईल. तसेच, २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी दुसरा अंतरिम लाभांश जाहीर केला जाईल.
4 / 9
कंपनीने आपल्या फायलिंगमध्ये म्हटले आहे, 'एक्सचेंजला कळविण्यात येते की, खालील बाबींवर विचार करण्यासाठी आणि मान्यता देण्यासाठी कंपनीच्या कॉर्पोरेट कार्यालयात बुधवार, १३ ऑगस्ट २०२५ रोजी बोर्ड सदस्यांची बैठक होईल.'
5 / 9
३० जून २०२५ पर्यंतच्या स्वतंत्र आणि एकत्रित आर्थिक निकालांवर मर्यादित पुनरावलोकन अहवाल आणि आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी दुसऱ्या अंतरिम लाभांशाची घोषणा करेल.
6 / 9
महत्वाचे म्हणजे, ट्रेडिंग विंडो आधीच बंद झाली आहे आणि निकाल जाहीर झाल्यानंतर ४८ तासांनी ती पुन्हा खुली होईल. असेही कंपनीने म्हटले आहे.
7 / 9
तत्पूर्वी, मे २०२५ मध्ये, कोलॅब प्लॅटफॉर्म्सने १:२ स्टॉक स्प्लिटची घोषणा केली होती, याची रेकॉर्ड डेट २१ मे निश्चित करण्यात आली होती. मार्च २०२४ मध्ये कंपनीने १:५ स्प्लिट लागू केले होते, यामुळे याची फेस व्हॅल्यू ₹१० वरून ₹२ प्रति शेअरवर आली होती.
8 / 9
या स्प्लिटसह, कंपनीने ०.५ टक्के अंतरिम लाभांश देखील जाहीर केला, जो प्रति शेअर ₹०.०१ च्या समतुल्य आहे. लाभांशाची रेकॉर्ड डेट २४ एप्रिल होती, ज्याचे पेमेंट १६ मे रोजी किंवा त्यापूर्वी नियोजित होते.
9 / 9
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :Stock Marketस्टॉक मार्केटInvestmentगुंतवणूकshare marketशेअर बाजारMONEYपैसा