शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 19:01 IST

1 / 9
शेअर बाजारात नुकत्याच आगमन झालेल्या नव्या कंपन्या, आपल्या दमदार कामगिरीने गुंतवणूकदारांना मालामाल करताना दिसत आहेत. अशीच एक कंपनी म्हणजे फ्लेवर्ड कंडोम (Flavoured Condom) बनवणारी अनोंदिता मेडिकेअर (Anondita Medicare), अवघ्या काही दिवसांत या कंपनीच्या शेअरने तब्बल 200 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
2 / 9
गेल्या महिन्यात सप्टेंबरमध्ये शेअर बाजारात लिस्ट झालेल्या अनोंदिता मेडिकेअरच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी दिसत आहे. मंगळवारी (7 ऑक्टोबर 2025) हा शेअर 7 टक्क्यांहून अधिकच्या उसळीसह 460 रुपयांवर बंद झाला. यापूर्वी सोमवारीही यात 10 टक्क्यांहून अधिकची वाढ नोंदवली गेली होती.
3 / 9
200% हून अधिक परतावा - अनोंदिता मेडिकेअरच्या आयपीओमध्ये (IPO) शेअरचा दर 145 रुपये निश्चित करण्यात आला होता. कंपनीचा आयपीओ 22 ते 26 ऑगस्ट 2025 दरम्यान खुला होता. 1 सप्टेंबर 2025 रोजी हा शेअर 275.50 रुपयांवर लिस्ट झाला आणि लिस्टिंगच्या दिवशी 289.25 रुपयांवर बंद झाला होता.
4 / 9
आता 7 ऑक्टोबर 2025 रोजी तो 460 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच, इश्यू प्राईसच्या तुलनेत कंपनीच्या शेअरने 200 टक्क्यांहून अधिकचा बंपर परतावा दिला आहे.
5 / 9
गुंतवणूकदारांकडून जोरदार प्रतिसाद कंपनीचा आयपीओला गुंतवणूकदारांचा प्रचंड प्रतिसात मिळाला. हा आयपीओ एकूण 300.89 पट सब्सक्राइब झाला. किरकोळ (Retail) गुंतवणूकदारांच्या श्रेणीत 286.20 पट, तर बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या (NII) कोट्यात 531.82 पट सबस्क्राइब झाला.
6 / 9
उत्र प्रदेशातील नोएडा येथे उत्पादन युनिट असलेली अनोंदिता मेडिकेअर लिमिटेड पुरुषांसाठी आणि महिलांसाठी फ्लेवर्ड कंडोम बनवते आणि ते 'COBRA' या ब्रँड नावाने विकले जातात.
7 / 9
कंपनीची वार्षिक उत्पादन 562 मिलियन कंडोम्स एवढे आहे. ती दक्षिणपूर्व आशिया, आफ्रिका आणि मध्य पूर्व (Middle East) यांसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये उत्पादनाची निर्यात करते.
8 / 9
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
9 / 9
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकMONEYपैसाStock Marketस्टॉक मार्केट