शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 16:10 IST
1 / 8शेअर बाजारातील एका छोट्या कंपनीचा शेअर मोठी कमाल करत आहे. याला शेअर ऐवजी पैशांचे झाड म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. कारण या शेअरने गेल्या 5 महिन्यांत जवळपास २०० टक्के तर ५ वर्षांत ७०७१ टक्के एवढा बंपर परतावा दिला आहे. 2 / 8याहूनही आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या शेअरने १९९५ पासून ते आतापर्यंत तब्बल ५१३१२% चा छप्परफाड परतावा दिला आहे. विशेष म्हणजे, हा शेअर प्रसिद्ध गुंतवणूकदार मुकुल अग्रवाल यांच्या पोर्टफोलिओचाही भाग आहे.3 / 8ज्या शेअरसंदर्भात आपण बोलत आहोत, तो ASM Technologies चा आहे. या कंपनीच्या शेअरने बुधवारी, २० ऑगस्ट २०२५ रोजी एक नवा इतिहास रचला. हा शेअर आता ₹३६३४ च्या नव्या विक्रमी उंचीवर पोहोचला आहे. जी एका दिवसातील १०% हून अधिक वाढ होती. गेल्या तीन दिवसांत तर या शेअरमध्ये ३३% ची तेजी दिसून आली आहे.4 / 8मात्र पाचवर्षांचा विचार करता या शेअरची किंमत ₹१२२३.८० वरून ₹३६३४ वर पोहोचला आहे. अर्थात हा शेअर १९७% ने वधारला आहे.5 / 8मुकुल अग्रवालांकडे १५.२५ लाख शेअर - बिझनेस स्टँडर्डच्या वृत्तानुसार, या तेजीमागील एक मोठे कारण म्हणजे, प्रसिद्ध गुंतवणूकदार मुकुल महावीर अग्रवाल यांचा या कंपनीवरील वाढता विश्वास. ६ ऑगस्ट २०२५ पर्यंतच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की, मुकुल अग्रवाल यांच्याकडे एएसएम टेक्नॉलॉजीजचे १५.२५ लाख शेअर्स आहेत, जे कंपनीतील ११.७% हिस्सेदारी एवढे आहेत. 6 / 8महत्वाचे म्हणजे, जून २०२५ च्या तिमाहीपर्यंत त्यांच्याकडे ७.६२ लाख शेअर्स होते, म्हणजेच त्यांनी अतिशय कमी कालावधीत या शेअरमधील आपला हिस्सा जवळजवळ दुप्पट केला आहे.7 / 8गेल्या पाच वर्षांत कंपनीचा स्टॉक ५,९६२% ने वधारला आहे आणि त्याने लहान गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. मात्र, पुढील मार्ग थोडा आव्हानात्मक असू शकतो. कारण, कंपनीचे पी/ई गुणोत्तर १०० च्या वर आहे. यामुळे तो महाग होते. 8 / 8(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)