शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मोदी सरकारच्या मदतीने सुरु करा 'हा' व्यवसाय; वर्षाकाठी होईल ६ लाखांचा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2019 3:16 PM

1 / 5
जर तुम्हाला नोकरीचा कंटाळा आला असेल आणि व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला असा प्लॅन सांगणार आहोत की, ज्यामुळे तुम्हाला व्यवसायाच्या माध्यमातून चांगली कमाई होऊ शकते. विशेष म्हणजे यासाठी केंद्र सरकारही तुमची मदत करेल त्यासाठी तुम्हाला ८० टक्के कर्ज उपलब्ध करुन देईल.
2 / 5
केंद्र सरकारच्या मदतीने तुम्ही साबण बनविण्याचा व्यवसाय सुरु करु शकता. त्यासाठी मुद्रा योजनेंतर्गत तुम्हाला ८० टक्के कर्ज मिळेल. तुम्हाला फक्त यासाठी ४ लाख रुपये खर्च करावे लागतील.
3 / 5
छोट्या शहरापासून गावापर्यंत साबणाची मागणी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे हा व्यवसाय मस्त चालेल. मुद्रा योजना अहवालानुसार तुम्ही वर्षाला जवळपास ४ लाख किलो उत्पादन करु शकता. त्याची किंमत ४७ लाख रुपये असेल. त्यातून खर्च वजा करता तुम्हाला ६ लाख रुपयांचा नफा होईल.
4 / 5
या व्यवसायासाठी तुम्हाला ७५० स्क्वेअर फूट जागा लागेल. ज्यामध्ये ५०० फूट जागा आरक्षित असेल तर बाकीची जागा अनारक्षित असेल. मशीन लावण्याचा खर्च १ लाख रुपये इतका आहे.
5 / 5
हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला १५ लाख ३० हजार रुपये खर्च येईल. ज्यासाठी तुम्हाला ३ लाख ८२ हजार खर्च करावा लागेल. कर्जासाठी तुमच्याकडे ४ लाख २३ हजार रक्कम असल्याचं दाखवावं लागेल. सरकारकडून वर्किंग कॅपिटल कर्ज स्वरुपात ९ लाख रुपये मिळतील आणि टर्म लोनसाठी ३ लाख ६५ हजार दिले जातील.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीbusinessव्यवसायbankबँक