शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट मनी मॅनेजमेंट: हे ४ नियम बदलतील तुमचे आर्थिक जीवन, कधीच पैशाची अडचण येणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 13:08 IST

1 / 5
आजच्या धावपळीच्या जीवनात पैशांचे योग्य नियोजन करणे हे तितकेच महत्त्वाचे झाले आहे, जितके पैसा कमावणे. चुकीच्या गुंतवणुकीमुळे, जास्त कर्जामुळे किंवा अचानक आलेल्या खर्चांमुळे संपूर्ण आर्थिक नियोजन कोलमडू शकते. म्हणूनच तुमच्या आर्थिक प्रवासाला सुरक्षित, स्थिर आणि यशस्वी ठेवण्यासाठी जगभर मान्यताप्राप्त पर्सनल फायनान्सचे ४ सुवर्ण नियम जाणून घ्या.
2 / 5
७२चा नियम : तुमचे पैसे दुप्पट व्हायला किती काळ लागणार? हा सोपा मानसिक गणिताचा नियम मदत करतो. व्याजदराने ७२ भागून अंदाज बांधा. व्याजदर जितका जास्त, दुपटीचा काळ तितका कमी. गुंतवणुकीचा परतावा समजून घेण्यासाठी हा सर्वांत मूलभूत आणि आवश्यक आर्थिक सूत्र आहे.
3 / 5
१०-५-३ चा नियम : गुंतवणुकीवर अपेक्षित परताव्याचे हे वास्तववादी दिशादर्शन आहे. शेअर्सवर अंदाजे १०%, बाँड्सवर ५% आणि बँक बचतीवर सुमारे ३% परतावा मिळू शकतो. यामुळे गुंतवणूक निवडताना अपेक्षांची मर्यादा राखता येते.
4 / 5
५०-३०-२० चा नियम : पगाराचे नियोजन करण्यासाठी बजेटिंगचे सुवर्ण सूत्र. ५०% गरजा, ३०% इच्छा-हौशी खर्च आणि २०% बचत किंवा गुंतवणूक. हा नियम पाळल्यास आर्थिक ताण कमी आणि बचतीची सवय मजबूत होते.
5 / 5
६X इमर्जन्सी नियम : अनपेक्षित संकटांपासून सुरक्षाकवच म्हणून किमान ६ महिन्यांच्या खर्चाएवढा आपत्कालीन निधी ठेवा. नोकरीची अनिश्चितता, वैद्यकीय खर्च किंवा घरातील आणीबाणी यासाठी याची मदत होते. यामुळे काहीही घडले तरी आर्थिक जीवन ढळणार नाही.
टॅग्स :MONEYपैसाInvestmentगुंतवणूक